माणुसकीला सलमा ! ‘कोरोना’विरूध्द लढण्यासाठी ‘या’ खेळाडूनं दिले तब्बल 8 कोटी

बार्सिलोना : वृत्तसंस्था – जग कोरोनाशी लढा देत आहे. अशा वेळी स्पॅनिश फुटबॉल क्लब बार्सिलोना स्टार फॉरवर्ड खेळाडू मेसी आणि मॅंचेस्टर सिटीचे मॅनेजर पेप गॉर्डिओला यांनी कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी तब्बल10 लाख युरो देण्यीची घोषणा केली आहे. भारतील चलनात हीच रक्कम 8 कोटी 20 लाख एवढी आहे.

मेसी हा अजेंटिनाचा आहे. त्याच्याकडून दिली जाणारी रक्कम बार्सिलोना येथील रुग्णालये तसेच अन्य आरोग्य सेवेसाठी वापरली जाणार आहे. याहबाबत रुग्णालयाच्या ट्विटर हॅंडलवर म्हटले आहे. की, कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी लियो मेसीने मदत केली आहे.त्याबद्दल लियो मेसीचे धन्यवाद आणि आभार.

त्यासोबतच बार्सिलोनाचे माजी खेळाडू व मॅनेजर गॉर्डिओला यांनीदेखील मदत म्हणून रक्कम दिली आहे. त्यानी ऐजल सोलर डेनियल फाऊंडेशन आणि बार्सिलोना वैद्यकिय महाविद्यालय याना ही रक्कम दिली आहे.