गौरवशाली क्षण ! 15 ऑगस्टला न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेयरवर प्रथमच फडकणार तिरंगा

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – भारतीयांसाठी येणारा स्वातंत्र्य दिन आणखी एक गौरवशाली क्षण घेऊन येणार आहे. अमेरिकेतील एका गटाने येत्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेयरवर भारतचा राष्ट्रध्वज फडकावण्याची घोषणा केली आहे. हे प्रथमच घडणार आहे. तीन राज्य न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि कनेक्टिकटचे फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशनने टाइम्स स्क्वेयरवर प्रथमच तिरंगा फडकवून 15 ऑगस्ट 2020 रोजी इतिहास रचला जाणार असल्याचा दावा केला आहे.

संघटनेनुसार, न्यूयॉर्कमध्ये भारताचे महावाणिज्य दूत रणधीर जयस्वाल ध्वजारोहण कार्यक्रमावेळी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. प्रथमच टाइम्स स्क्वेयरवर तिरंगा फडकवला जाणार आहे. येथे स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात येईल, ज्यामध्ये ध्वजारोणाशिवाय भारतीय संस्कृतीशी संबंधित देखाव्यांचा समावेश असेल. याशिवाय एम्पायर स्टेट बिल्डिंगवर प्रोजेक्टरद्वारे भारतीय गुणवत्तेचे सादरीकण केले जाईल. बिल्डिंगला भारतीय स्वतंत्र्य दिनाच्या सन्मार्थ तिरंगी रंगाच्या प्रकाशात सजवण्यात येईल.

14 ऑगस्टपासूनच रंगणार बिल्डिंग
लाइव्ह मींट रिपोर्टनुसार, एम्पायर स्टेट बिल्डिंगला 14 ऑगस्टपासूनच तिरंगी प्रकाशाने सजवण्यात येईल. संघटनेने म्हटले, भारत-अमेरिकेचे नाते मजबूत असल्याची झलक 15 ऑगस्टला टाइम्स स्क्वेयरवर संपूर्ण जग पाहिल. भारतीय-अमेरिकन कम्युनिटीसाठी हा गौरवशाली क्षण असेल. एफआयए अनेक संघटनांचा एक गट आहे, जो भारतीयांच्या हितासाठी जगभरात काम करत आहे. संघटनेचे चेयरमन अंकुर वैद्य यांनी सांगितले की, भारतीय-अमेरिकन समाज कोरोना व्हायरसने खुप प्रभावित आहे. अशाप्रकारचे कार्यक्रम अशा धैर्य वाढवण्याचे काम करतात.