मौजमजेसाठी दुचाकी चोरणारे दोन अल्पवयीन पुणे पोलिसांच्या ताब्यात

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन
मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या १५ आणि १६ वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलांना अंलकार पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन मुलांनी निगडी, अलंकार, कोथरुड, वारजे चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्या आहेत. अलंकार पोलिसांनी ही कारवाई कमिन्स कंपनीसमोर केली.
मागील काही दिवसांपासून कोथरुड परिसरातून दुचाकी चोरीच्या घटना वाढत आहेत. गुन्हेगारांचा शोध घेत असताना कोथरुड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रमोद मोहिते यांना कमिन्स कंपनीसमोर दोन अल्पवयीन मुले दुचकीवरुन संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली. अलंकार पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी सापळा रचून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीची कागदपत्रे मागितली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी कसून चौकशी केली असता दुचाकी चोरीची असल्याचे सांगितले.
[amazon_link asins=’B014CLL3KS,B07437YHXP,B07DNS3KCB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0f8bc5bf-c56f-11e8-80d0-f300fc108bc1′]
अलंकार पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलांकडून ७ दुचाकी जप्त केल्या आहे. चौकशी दरम्यान मौजमजेसाठी दुचाकी चोरल्याची कबुली दिली. अल्पवयीन मुलांनी डहाणुकर कॉलनीतून १, कोथरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २, चतु:शृंगी, निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १ दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग रविंद्र सेनगावकर, परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे, सिंहगड रोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते, अलंकार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्पना जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अंबरिष देशमुख, संजय पांढऱे, पोलीस हवालदार मुंढे, पोलीस नाईक प्रमोद मोहिते, गणेश दळवी, सचिन बुधावले, नितीन पडवळ, किरण नेवसे, गौस मुलाणी, भाऊराव डपसे यांच्य पथकाने केली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a575b8c1-c56e-11e8-a234-552dae799121′]
जाहिरात