सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी वेस्टर्न रेल्वे चालवणार आणखी 150 ट्रेन, जाणून घ्या कधी होणार सुरू

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता भारतीय रेल्वे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी आणि ट्रेनमधील गर्दी कमी करण्यासाठी आता वेस्टर्न रेल्वेच्या 150 नव्या ट्रेन सुरू करणार आहे. वेस्टर्न रेल्वे अगोदरच 350 ट्रेन चालवत आहे. आता आणखी 150 ट्रेन चालवणार आहे. या ट्रेन 21 सप्टेंबरपासून चालवल्या जातील. याशिवाय भारतीय रेल्वेने 21 सप्टेंबरपासून 20 जोडी क्लोन ट्रेन चालवण्याची घोषणा केली होती.

यापैकी बहुतांश ट्रेन बिहारसाठी आहेत. या ट्रेनच्या 19 जोड्यांचे तिकिट हमसफर एक्सप्रेसच्या दराप्रमाणे असेल, लखनऊ आणि दिल्लीदरम्यान क्लोन ट्रेन जनशताब्दी एक्सप्रेसच्या दराप्रमाणे असेल. रेल्वे अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, क्लोन ट्रेन सध्या सुरू असलेल्या 310 जोडी ट्रेनशिवाय अतिरिक्त असतील. या 40 ट्रेनमध्ये सर्वात जास्त 22 ट्रेन बिहारला जातील किंवा तेथून प्रवाशांना घेऊन येतील.

याशिवाय सुद्धा अनेक ट्रेन बिहारवरून जातील. इंडियन रेल्वे देशभरात आपल्या सुमारे 7000 रेल्वे स्टेशनपैकी सुमारे 1000 स्टेशनांवर यूजर चार्ज लावण्याचा विचार करत आहे. यामुळे ट्रेनचे तिकिट महागणार आहे. हा चार्ज एयरपोर्टप्रमाणे असेल. दिल्ली, मुंबईप्रमाणे मोठ्या स्टेशनांवर असा चार्ज शक्य आहे. परंतु, यूजर फी किती असेल हे अजून ठरलेले नाही.