पाच हजार किलो वांग्याचं भरीत बनवण्यासाठी तयार केली भलीमोठी कढई

 कोल्हापूर  :  शिल्पा माजगावकर

भारतातील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे डिसेंबर महिन्यामध्ये जळगाव येथे तब्बल पाच हजार किलोच्या वांग्याचं भरीत बनवण्याचा विश्वविक्रम करणार आहेत. हा विश्वविक्रम करण्यासाठी त्यांना एका भल्या मोठ्या कढईची गरज होती. त्या साठी एक विशिष्ट पद्धतीची कढई तयार करून मिळावी यासाठी त्यांनी महाराष्ट्रातल्या विविध उद्योजकांना संपर्क साधला . मात्र अशा पद्धतीची कढई त्यांना बनवून मिळाली नाही. अखेर कोल्हापूरचे उद्योजक निलेश पै यांनी ती कढई बनवून देण्याचं मान्य केलं आणि गेली चार महिने त्याच्यावर काम सुरू केलं. कोल्हापुरातील स्फूर्ती इंडस्ट्रीज मध्ये ही भली मोठी कढई बनविण्यासाठी गेली चार महिने 20 हून अधिक कामगार काम करत आहेत. स्टेनलेस स्टील मध्ये ही कढई आता पूर्ण झाली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9c2eeb53-bc0c-11e8-989d-bd938e9ae9e0′]

गणेश विसर्जनासाठीचा रथ अडकला झाडात ; वाहतुकीचा खोळंबा