मॉडेलचा चोरून व्हिडीओ काढणाऱ्या ‘त्या’ अभिनेत्यावर गुन्हा दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता एजाज खानवर महिला मॉडेलचं चित्रीकरून करून अश्लील शेरेबाजी केल्याने आणि दिग्दर्शकाला मारहाण केल्याने तक्रार दाखळ करण्यात आली होती. यानंतर आता वाशी पोलीसांनी एजाज खान विरोधात गुन्हा दाखल केला आहे. एका फॅशन शो दरम्यान त्याने मॉडेलचं चित्रीकरण केलं होतं.

नेमकं काय प्रकरण आहे ?

वाशी सिडको ऑडिटोरिअममध्ये काल (मंगळवार दि 30 एप्रिल) इंडिया डिझाईन वीक फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी अभिनेता एजान खान याला स्वतंत्र चेंजिंग रुम हवी होती. ती न दिल्याने एजाज खान वाद घालू लागला. त्यानंतर त्याने चेंजिग रुमजवळील एका महिला मॉडेलचं शुटींग केल. त्यानंतर त्याच्यावर अश्लील शेरेबाजी केली. एवढे करून तो थांबला नाही त्याने दिग्दर्शक अब्दुल शिकूर खान आणि मॉडेल पंकज कुमार यांना लाथा बुक्क्या घालत मारहाण केली. यात ते जखमी झाले.

या सर्व प्रकारानंतर या फॅशन शोच्या आयोजिका असणाऱ्या दिपशिाय चौधरी यांनी वाशी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मॉडेलचं चित्रीकरण, मारहाण, शिवीगाळ, आणि बेकायदेशीर जमाव जमवून दंगा केला असा गुन्हा एजाज खानवर दाखल केला आहे.

कोण आहे एजाज खान ?

बॉलिवूडमध्ये काम करणारा एक अभिनेता एजाज खान आहे. रक्तचरित्र, अल्लाह के बंदे हे त्याचे सिनेमे गाजले आहेत. रहे तेरा आशीर्वाद, कहानी हमारे महाभारत की, यांसारख्या काही मालिकेतही त्याने काम केले आहे. नेहमीच वादात अडकणारा असा अभिनेता एजाज खान आहे.