अनेक वर्षे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याची ‘खदखद’ : खा. अमोल कोल्हे

शिक्रापुर : प्रतिनिधी (सचिन धुमाळ) –   पुणे जिल्ह्यातील पंचतारांकित औद्योगिक क्षेञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सणसवाडी शिक्रापूर परिसरात कोरोनाचे थैमान घातले असून वाढती कोरोना रूग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन,लोकप्रतिनिधी प्रयत्न करत असून आज सणसवाडी या ठिकाणी तब्बल १५० बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे तर दोन सुसज्ज रुग्णवाहिकाचे लोकार्पण सोहळा यावेळी पार पडला.याप्रसंगी खासदार डॉ. अमोल कोल्हे ,आमदार अशोक पवार ,जिल्हा परिषद सदस्य कुसुम मांढरे ,पंचायत समिती सभापती मोनिका हरगुडे, प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख ,गट विकास अधिकारी विजयसिह नलावडे हे उपस्थित होते.

amol kholhe

या वेळी बोलताना खासदार कोल्हे यांनी पालकमंत्री , आरोग्य मंत्री आणि प्रशासन यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून गेली कित्येक वर्षापासून सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याची खंत व्यक्त करत काही ठिकाणी व्हेंटिलेटर आहे तर तज्ञ डॉक्टर नाहीत तर काही ठिकाणी तज्ञ डॉक्टर आहेत तर व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे म्हटले असून जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू दर जुन्नर तालुक्यात असल्याचे कोल्हे यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारल्यानंतर खासदार डॉक्टर अमोल कोल्हें यांनी जुन्नर तालुक्यात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यासाठी मेहनत घेत असल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like