फ्लिपकार्ट वरुन त्यांनी मागविला खुनासाठी चाकू  

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन

अभ्यासात हुशार असलेला तरुण वाईट संगतीला लागला तरी त्याच्यातील हुशारी लपून रहात नाही. पण ती गुन्हेगारी कृत्याकडे वळते आणि त्यातून दुसऱ्यावर घाला घातला जातो. गुन्हेगारांनी आता शस्त्रे मागविण्यासाठी कुरिअरचा आसरा घेण्यास सुरुवात केली आहे. प्रतीक ढेंगरे याची हत्या करण्यासाठी हल्लेखोरांनी चक्क फ्लिपकार्ट या आॅनलाईन वेबसाईटवरुन चाकू मागविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

[amazon_link asins=’B074P395G9,B07DNZLGFL’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’590c5c82-b004-11e8-afdf-69f17f3cbdf1′]

अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३१ आॅगस्टला भरदुपारी प्रतीक संजय ढेंगरे (वय १९) याची पवन ऊर्फ आलू भोसले (वय २४, रा. वसंतनगर), स्नेहांशू बोरकर (वय २२, रा. भगवाननगर) आणि निहाल शंभरकर (वय २३, रा. कुकडे लेआऊट) या तीन कुख्यात गुंडांनी निर्घृण हत्या केली. त्यातूनच ही धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

आलू भोसले आणि निहाल शंभरकर हे दोघे सराईत गुन्हेगार आहेत. तर, स्नेहांशू बोरकर हा या दोघांच्या संगतीला लागेपर्यंत अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून परिसरात ओळखला जात होता. त्याला १० वीत ९२ टक्के गुण मिळाले असून, तो चांगला जलतरणपटू आहे. त्याने स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये पुरस्कार मिळवला आहे. गेल्या वर्षीपर्यंत अभियंता बनण्याचे ध्येय उराशी बाळगणाºया बोरकरने कुख्यात आलू भोसले आणि निहाल शंभरकरच्या संगतीत आल्यानंतर चांगले गुण सोडून वाईट गुण स्वीकारले. त्याने आपली हुशारी गुन्हेगारीत वापरणे सुरू केले. प्रतीक ढेंगरेच्या हत्येचा कट बोरकर, भोसले आणि शंभरकर या तिघांनी तीन आठवड्यांपूर्वीच रचला होता. हत्या केल्यानंतर कुठे पळून जायचे, त्याचाही प्लॅन त्यांनी आधीच तयार केला होता.

मुंडन करुन अल्पवयीन मुलीची नग्न धिंड काढली

प्रतीकला मारण्यासाठी त्यांनी फ्लिपकार्ट या वेबसाईटवरून तीक्ष्ण चाकू मागवून घेतला होता. बोरकरने थ्रीडी १००४ कोड असलेला अत्यंत धारदार चाकूची आॅर्डर १३ आॅगस्ट २०१८ ला फ्लिपकार्टवर नोंदवली. दोन्हीकडून फोल्ड होणाऱ्या या चाकूमध्ये की फिचर असून त्याचा कसाही वापर केला जाऊ शकतो. २८ आॅगस्टला दुपारी २२४ रुपये देऊन बोरकरने घातक चाकूची डिलिव्हरी कुरियरच्या माध्यमातून घेतली होती. चाकू मिळविल्यानंतर ते प्रतीकचा गेम करण्याची संधी शोधू लागले. ३१ आॅगस्टला दुपारी सम्राट अशोक गार्डनमध्ये प्रतीक असल्याचे कळताच हे तिघे तेथे आले आणि त्यांनी त्याची हत्या करून त्याचा मृतदेह दुचाकीवर मेडिकलच्या आवारात नेऊन सोडला. त्यानंतर ठरल्याप्रमाणे कुख्यात आलू भोसले दुसरीकडे तर बोरकर आणि शंभरकर हे दोघे चंद्रपूरला नातेवाईकांकडे पळून गेले. तेथे नातेवाईकांनी त्यांना फटकारल्याने ते वर्धेतील आत्याकडे पोहचले आणि शनिवारी रात्री पोलिसांच्या हाती लागले. त्यातून नागपुरातील गुन्हेगार शस्त्रे विकत घेण्यासाठी वेबसाईटचा वापर करीत असल्याचे उघड झाले आहे.