पीळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी गाईचे दूध चांगले की म्हशीचे?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गाय आणि म्हैस यापैकी कुणाचे दूध फायदेशीर आहे, याविषयी तज्ज्ञ सांगतात की, गाय आणि म्हैस दोन्हींचे दूध व्यक्तीच्या गरजेनुसार फायदेशीर ठरते. मात्र, मसल्ससाठी म्हशीचे दूध जास्त फायदेशीर असते. म्हशीच्या दुधामध्ये गायीच्या दुधापेक्षा जास्त पोषकतत्वे असतात. ते जास्त घट्ट असते. लहान बाळांसाठी किंवा ज्यांना दूध पचत नाही त्यांनी गायीचे दूध घ्यावी. ज्यांना बॉडी बनवायची आहे त्यांच्यासाठी म्हशीचे दूध चांगले असते.

म्हशीच्या दुधामध्ये गायीच्या दुधापेक्षा जास्त कॅलरी असतात. यामुळे मसल्सचा जलद विकास होतो. म्हशीच्या दुधामध्ये गायीच्या दुधापेक्षा दुप्पट फॅट असते. हे मसल्स डेव्हलपमेंटसाठी गरजेचे आहे. म्हशीच्या दुधामध्ये गायीच्या दुधापेक्षा कमी कोलेस्टेरॉल असते. हे हार्ट डिसिजपासून बचाव करते. म्हशीच्या दुधामध्ये कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फोरस सारखे मिनरल्स गायीच्या दुधापेक्षा जास्त असतात. म्हशीच्या दुधामध्ये रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन इ१२, व्हिटॅमिन अ,उ आणि थायमीन जास्त प्रमाणात असते.

म्हशीच्या दुधामध्ये गायीच्या दुधापेक्षा अनेक हेल्दी अ‍ॅमिनो अ‍ॅसिड्स जास्त असतात. यामुळे मसल्स मजबूत होतात. मसल्स बनविण्यासाठी प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न, बायोटिन, व्हिटॅमिन उ, बायोटिन, ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड्स, कॅलरीज ही आवश्यक पोषकतत्वे असतात. म्हैशीच्या १०० मिली दुधात कॅलरी ९७, प्रोटीन ३.७ ग्रॅम, फॅटी ६.९ ग्रॅम, पाणी ८४%, लॅक्टोस ५.२ ग्रॅम, मिनरल्स ०.७९ ग्रॅम असते. तर गायीच्या १०० मिली दुधात कॅलरी ६१, प्रोटीन ३.२ ग्रॅम, फॅट ३.४ ग्रॅम, पाणी ९०%, लॅक्टोस ४.७ ग्रॅम, मिनरल्स ०.७२ ग्रॅम असतात. म्हशीच्या दुधामध्ये गायीच्या दुधापेक्षा जास्त प्रोटीन असते. हे मसल्स मजबूत आणि हेल्दी बनवते.