…म्हणून त्याने केली पोलीस अधिकारी पत्नीची हत्या 

गुजरात  : वृत्तसंस्ठा  – संपत्तीसाठी कोण कोणाच्या जीवावर उठेल हे सांगता येत नाही. अगदी सख्खा भावापासून ते जन्म दिलेल्या मुलांपर्यंतही कोणाचं काही सांगता येत नाही. अशीच काहीशी एक घटना समोर आली आहे. चक्क जीवाचीच व्यक्ती जीवावर उठल्याचे समोर आले आहे. एका पतीने चक्क संपत्तीसाठी पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. केवळ पत्नीच्या नावावर असणारी संपत्ती बळकावण्यासाठी हे केले आहे. नवऱ्याने चक्क तिची भोकसून हत्या केली. किरण जोशी असं या महिलेचे नाव आहे. किरण यांच वय 41 वर्षे होते. धक्कादायक बाब अशी की, सदर महिला ही गुजरात पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होती. पंकड वेगडा असं या आरोपी नवऱ्याचं नाव आहे.
अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच किरण जोशी या विवाहबंधनात अडकल्या होत्या. पोलिसांनी या हत्ये प्रकरणी नवरा आणि सासरकडच्या तिघाजणांना अटक केली असल्याचे समजते आहे. पोलिसांनी तिचा नवरा पंकड वेगडा, भाऊ दीपक, सासरे भवानीशंकर आणि सासू रसिला यांना अटक केली आहे. सदर घटनेमुळे परिसरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आयुष्याचा जोडीदारच आयुष्यावर उठू शकतो यामुळे आश्चर्यही व्यक्त केलं जात आहे.
Advt.
काय आहे नेमकी घटना ?
आरोपी पंकजला त्याचा व्यवसाय सुरू करायचा होता. तो एक बेरोजगार असून त्याला व्यवसाय सुरू करण्यासाठी किरणची संपत्ती विकायची होती. विशेष म्हणजे घर हे किरण यांच्या नावावर होते. इतकेच नाही तर त्या घरावर सासरकडच्या मंडळींचा डोळा होता असा आरोप किरणचा भाऊ महेशने केला आहे. परंतु घर विकण्याचा प्रस्ताव किरण यांना अजिबात मान्य नव्हता. दोघेही वेगळे झाले होते. घटनेच्या रात्री पंकज अन्य आरोपींसह किरणच्या घरी गेला व तिच्याबरोबर वाद घातला. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी धारदार शस्त्राने किरण यांच्यावर सपासप वार केले. यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला. पत्नीची हत्या केल्यानंतर त्यांनी घर बंद केले व तिथून पळ काढला.