उत्तरप्रदेशात मुख्यमंत्री योगी राबवणार ‘एँन्टी रोमियो स्कॉड’ मोहीम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अलीगढमधील लहान मुलींवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रकाराने कोंडीत सापडलेल्या उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने कठोर पावले उचलत उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा एँन्टी रोमियो स्कॉड सक्रिय करण्याचा विचार सुरु केला आहे. महिला सुरक्षेचा विचार करता, आणि महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या प्रकारांचा विचार करता, हा विचार पुढे येत आहे. योगी सरकारने उत्तर प्रदेशात महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे पोलिस अधिकाऱ्यांना कठोर पावले उचलण्याचा निर्देश दिला आहे. तसेच एँटी रोमियो स्कॉड पुन्हा एकदा सक्रिय केली जावी असे सांगितले आहे.

योगी अदित्यनाथ यांनी महिला सुरक्षेबाबत उचलले कठोर पाऊल –

मुख्यमंत्री योगींकडून एँन्टी रोमियो स्काँड सक्रिय करुन जूनच्या पुर्ण महिन्यात अभियान राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गर्दीच्या ठिकाणी तसेच संवेदनशील ठिकाणी एँटी रोमियो स्कॉ़ड कायम सक्रिय राहण्याचे आदेश योगींनी दिले आहेत. तर १०० नंबर डायल या पोलिसांद्वारे पेट्रोलिंग करण्यात येणाऱ्या गटांना सक्रिय राहण्यास सांगण्यात आले आहे. मागील वेळी देखील एँटी रोमियो स्कॉड मोहिम राबवण्यात आली होती परंतू त्यात अपेक्षित यश आल्याचे दिसले नाही.

भाजपने उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणूकी वेळीच एँन्डी रोमियो स्कॉड बनवण्याचे आश्वासन आपल्या जाहिरनाम्यात दिले होते. ज्यावर अमंलबजावणी देखील करण्यात आली होती. पोलिसांनी मुलींना महिलांना छेडणाऱ्यांवर रोख लावण्यासाठी बगीचे, गर्दीचे भाग आणि शाळा-कॉलेज या बाहेर हे अभियान राबवले होते, याची भरपूर चर्चा झाली मात्र काही महिन्यात ही मोहीम बंद झाली होती.

आरोग्यविषयक वृत्त –

वजन कमी करण्याची ‘ही’ थेरपी करून पाहा

घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका

रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?

झोपेत असताना कुणी छातीवर बसल्यासारखे वाटलेय का ?