स्ट्रेसमुळं डोळ्याच्या खाली होणार्‍या डार्क सर्कलपासून गुलाबाच्या पाण्यानं मिळते सुटका, जाणून घ्या इतरही फायदे

पोलीसनामा ऑनलाइन – गुलाब पाणी फ्लेवर्ड, सुगंधित असते. हे गुलाबाची पाने पाण्यात भिजवून तयार केले जाते. गुलाब जल आपल्याला प्रत्येक भारतीय घरात दिसते. गुलाब पाणी केवळ त्वचेसाठी सर्वोत्कृष्ट आहे असे नाही तर ते डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. डोळ्यांसाठी आपण हे ऑरगॅनिक क्लिन्झर आणि अ‍ॅस्ट्रीजेंत म्हणून देखील वापरू शकता. तसेच, गुलाब पाण्यामध्ये अँटी-सेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म आहेत जे डोळ्यांत धूळ आणि प्रदूषणामुळे होणारी जळजळ दूर करते. गुलाब पाण्याचे आणखी बरेच फायदे आहेत ….

कमी झोपेमुळे, स्ट्रेस किंवा टेन्शनमुळे डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल्स होतात, ज्याला साफ करण्यासाठी गुलाब जल प्रभावी आहे. एका भांड्यात दोन चमचे थंड दूध आणि दोन चमचे गुलाब पाणी मिसळा. 20 ते 25 मिनिटे हे मिश्रण बाजूला ठेवा. हे मिश्रण कापसाच्या मदतीने डोळ्याखाली लावा. थोड्या वेळाने थंड पाण्याने डोळे धुवा. चांगल्या रिझल्टसाठी ही क्रिया आपण रोज करा.

संगणकासमोर बरेच तास काम केल्यामुळे डोळ्यांची जळजळ होणे ही एक सामान्य समस्या आहे. यापासून मुक्त होण्यासाठी गुलाबाचे पाणी सामान्य पाण्यात मिसळा आणि डोळे चांगले धुवा. डोळ्यांमध्ये जळजळ झाल्यामुळे आपण खूप अस्वस्थ होतो. अश्या परिस्थितीत डोळ्यांत गुलाब पाण्याचे काही थेंब टाका आणि 10 मिनिटे डोळे बंद ठेवा. तुम्हाला बरे वाटेल आणि डोळ्यांतील जळजळीपासून सुटका होईल.

वातावरणातील प्रदूषण आणि घाणीचा आपल्या डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. केवळ पाण्याने स्वच्छ करून डोळ्यांतील घाण काढणे थोडे अवघड आहे. अशा वेळी रात्री झोपायच्या आधी गुलाबाच्या पाण्याचे काही थेंब डोळ्यात घाला आणि बोटाने डोळे हलके दाबा. थोड्या वेळाने आपले डोळे सामान्य पाण्याने धुवा.