जमीन ताब्यात घेण्यासाठी ‘कर्नल’ ने केला लष्कराचा वापर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खेड तालुक्यातील गुळाणी येथे एका लष्करी कर्नलने जमिनीचा ताबा घेण्यासाठी चक्क ३० ते ४० जवानांना आणले व जबरदस्तीने शेतात पेरलेल्या सोयाबीन पिकामध्ये ट्रॅक्टरने नांगरणी करून नुकसान केले. हातात रायफल घेतलेले जवान बरोबर असल्याने कोणीही त्यांना विरोध करुन शकले नाही. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतरही त्यांनी केवळ गुन्हा दाखल करण्याचे काम केले.

खेड पोलिसांनी कर्नल केदार विजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, मोनिका गणेश गाडे (रा. खालुंब्रे, ता. खेड) यांचे नांदावे सुनील नामदेव भरणे (रा. माण, ता. मुळशी) यांनी गुळाणी येथील जमीन गट नंबर २४४ असलेली जमीन सन २०१८ खरेदी करून कागदपत्रे सातबारावर नावे झाल्याने या सदर या जमिनीचे मालक भरणे व गाडे आहेत. गुळाणी येथे कर्नल केदार विजय गायकवाड हे ४ लष्कराच्या गाड्यांमधून ३० ते ४० जवानांना घेऊन शस्त्रासह गावात आले होते.

कर्नल विजय केदार गायकवाड हे त्या जवानांना घेऊन गावामध्ये रायफल्स बेकायदा जमाव जमून फिरून दहशत निर्माण होईल, असे कृत्य करत होते. त्यानंतर त्यांनी या जवानासह गाडे व भरणे यांच्या मालकीच्या शेतात ट्रॅक्टर लावून मशागत करण्यास सुरुवात केली परंतु, त्यांच्याबरोबर असलेले लष्कराचे जवान हे शस्त्रधारी असल्याने भीतीपोटी कोणीही कुठल्याही ही प्रकारचा विरोध अथवा प्रतिबंध केला नाही.

शेतात पेरलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान केले होते. शेतात नागरंट करुन पिकांचे नुकसान केल्यानंतर ते सर्व जण आले तसे निघून गेले.शेताचा ताबा घेण्यासाठी कर्नल गायकवाड यांनी लष्करातील आपल्या पदाचा गैरवापर केल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आरोग्य विषयक वृत्त

हळदीचे ‘हे’ दोन फेसपॅक वापरून तुम्ही दिसाल तजेलदार

तांब्याची बॉटल खरेदी करताना घ्या ही काळजी

मेकअप रिमूव्ह करुन झोपा नाहीतर त्वचेला होईल नुकसान

हाताला ६ बोटे असणे असते फायद्याचे