#YogaDay 2019 : योगा कराच ! पण ‘हे’ नक्‍की समजून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आजच्या जगात फिट राहण्यासाठी लोक जीम, एरोबिक्स असे अनेक नानावीध क्लासेस लावतात. पण हे सगळं करूनही आपल्या चेहऱ्यावर येणारे तेज किंवा आतून येणारी शक्ती हवी तेवढी येत नाही. कारण एकच की शारिरीक व्यायामाने मानसिक समतोल साधता येत नाही. आपल्यातील आंतरिक शक्तीसाठी आपल्याला शारिरीक व्यायाम लागतोच तसंच मानसिक समतोल साधण्यासाठी योगाचे महत्त्व अनन्य साधारण आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात योगाचा समावेश केलाच पाहिजे. कारण योगा हा असा एकमेव मार्ग आहे, जो आपले शरिर आणि मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवू शकतो.

आता योगा करायचा म्हटल्यावर तो कधीही कुठेही करायाचा नसतो. त्याची एक योग्य वेळ असते. जसे शरिरासंबंधी कुठलंही कार्य होण्याच्या वेळा ठरलेल्या असतात. तसंच काहीस योगाचे आहे. योगा मनाला येईल तेव्हा कुठेही करायचा नसतो.

योगाचे महत्त्व समजून अनेक लोकांनी योगा करण्यासाठी सुरुवात तर केली. पण त्यांना योगा कधी कुठे कसा करावा याची कल्पना नसते. त्यामुळे चांगले काम चुकीच्या वेळी केले तर त्याचा किती चांगला फायदा होईल, हे सांगणे कठीणच. कारण योगा चुकीच्या वेळी केला तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.

योगासने कोणत्यावेळी करावी आणि कशी करावीत याचे काही नियम आहेत. त्यापद्धतीनेच योगाभ्यास केल्यास त्याचा लाभ दिसून येतो. योगशास्त्रात योगासने करण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. कोणत्या वेळी योगसने करू नये याविषयी महत्त्वाच्या सूचना आहेत.

योगासने कधी करू नयेत

१. आपण आजारी असाल तेव्हा

२. कोणत्याही प्रकारची नशा केली असेल तेव्हा

३. भूक, झोप किंवा अन्य कारणामुळे शरीरात अशक्तपणा असेल तेव्हा

४. भोजन केल्यानंतर ५ तास होण्यापूर्वी

५. अतिशय भूक किंवा तहान लागलेल्या स्थितीत

६. मन संतापाने क्रुद्ध असेल तेव्हा

७. स्त्रीयांनी मासिक पाळी सुरू असताना

शास्त्रात सांगितलेल्या वेळीच योगासने करावीत तरच तुमच्या योगासनांचे योग्य ते आणि चांगले फळ प्राप्त होईल.

आरोग्यविषयक वृत्त

पावसाळ्यातील व्हायरल फीव्हरपासून असा करा बचाव

‘या’ सवयी ठरु शकतात घाताक, आरोग्याचे होते नुकसान

महिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त

३ मिनिटात जाणून घ्या तुमचे हृदय किती तरुण आणि हेल्दी

हृदय निरोगी राहण्यासाठी घ्यावा ‘हा’ आहार

या फळांचे ज्यूस घेतल्याने नष्ट होतील गंभीर आजार

सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन