तब्बल अकरा तास उशिराने एअर इंडिया झेपावले आकाशात 

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दुबईकडे रवाना होणारे एअर इंडियाचे विमान तब्बल अकरा तास उशिराने उडाले. काल रात्रीपासून खोळंबलेले विमान अखेर आज (शुक्रवार) सकाळी सात वाजता हवेत झेपावले. एअर इंडियाच्या खोळंब्यामुळे जवळपास 150 प्रवासी रात्रभर विमानतळावर मुक्कामी होते.
[amazon_link asins=’B07FBMMW5P’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ff66447b-96fb-11e8-8ed4-e1181bc91a2e’]

मुंबईवरून दुबईला जाणारे एअर इंडियाचे एआय 983 हे विमान काल रात्री दुबईकडे उड्डाण भरणार होते, मात्र प्रवासी विमानात बसले तेव्हा विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे पायलटच्या लक्षात आले. पायलटने तांत्रिक बिघाड असल्याचे लक्षत आणून दिल्यानंतर विमानाचे उड्डाण थांबवले गेले. यांनतर प्रवाशांना वेटिंग रूम मध्ये बसून ठेवण्यात आले. प्रवाशांना याबाबत कुठल्याही सूचना दिल्या गेल्या नाहीत, तसेच एजंटकडून तिकिटाचे पैसे परत घ्या असे उत्तरे अधिकाऱ्यांनी दिल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. या मनस्तापामुळे प्रवाशी चांगलेच संतापले असून त्यांनी प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली.