शेतकऱ्यांसाठी ‘अच्छे दिन’, यंदा कांदा ‘भाव’ खाणार

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – यंदा पाऊस खूपच कमी पडल्याने कांद्याचे उत्पादन ही कमीच झाले होते. त्यामुळे कांद्याचे भाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी कांदा मोठ्याप्रमाणावर साठवला आहे. सध्या बाजारात कांद्याला २० ते २६ रुपये भाव मिळत आहे. आणि पुढील काही दिवसात हे भाव अजून वाढतील. याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा कांद्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन येणार आहेत.

आता कांद्याचे सर्व अर्थकारण पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे पाऊस जर अजून काही दिवस लांबणीवर पडला तर शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असणार आहे. मात्र कांदा खरेदी करणाऱ्यांच्या डोळ्यात कांदा पाणी आणणार आहे. सध्या गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात गेल्या काही दिवसापासून कांद्याची आवक घटली होती.

त्यामुळे कांद्याचे भाव वाढत चालले आहेत. मागच्या महिन्यात १२५ते १५० ट्रक कांदा बाजारात पाठवला जात होता. पण या आठ्वड्यात ७० ते ८० ट्रक कांदा पाठवला जात आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात कांद्याचे भाव वाढत चालले आहेत. परंतु उन्हाळ्यामध्ये कांदा साठवला असल्यामुळे आता बाजारात खराब कांदा येण्याची शक्यता आहे.

बऱ्याच दिवसापासून कांदयाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र गेल्याकाही दिवसापासून कांद्याचे भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान कारक वातावरण निर्माण झाले आहे.

कांदा यंदाही रडवणार !

आरोग्य विषयक वृत्त –

वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे : अशी ओळखा ब्रेन ट्यूमरची लक्षणे

वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे : अशी ओळखा ब्रेन ट्यूमरची लक्षणे

बडीशेपचे पाणी प्या, उन्हापासून सहज हाईल बचाव

उन्हाळ्यात घामोळ्यांचा त्रास होत असेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय