प्रथमच अतिदुर्गम भागातील 100 रक्तदात्यांनी केलं रक्तदान ! Covid-19 पासून बचाव करण्याकरिता स्टीमर मशीन देऊन केला सन्मान

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रक्ताचा तुटवडा होत असताना मुरबाड मधील पंचायत समितीचे माजी सदस्य अनिल घरत यांनी आपला वाढदिवसाचा गाजावाजा नकरता संपूर्ण दिवस कुटुंबा पासून दूर राहून रक्तदान शिबीरराचे आयोजन करून स्वत: रक्तदान करून आपला वाढदिवस साजरा करून आनंद व्यक्त केला या वेळी प्रत्येक रक्तदात्याला स्टीम मशीन देऊन त्यांचा सन्मान केला.

गेली आठ महीन्यापासून कोराना आजारामुळे बाधीत रुग्णांना रक्त आवश्यकता भासत असून. परंतू मागणी पेक्षा पुरवठा कमी होता असल्याने. भविष्यात गरजवंताला त्वरीत रक्त मिळावे म्हणून समाजासाठी सतत धडपड असणारे मुरबाड पंचायत समितीचे माजी सदस्य अनिल घरत यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून, कच्छ युवक संघ कल्याण यांच्या वतिने ॲन्करवाला रक्तदान अभियान अंतर्गत टोकावडे येथील वनविभागाच्या सभागृहात रक्तदान शिबीर पार पडले.

मुरबाड पंचायत समितीचे माजी सदस्य अनिल घरत यांचा 37 वा वाढदिवस अनिलभाऊ घरत मिञ परीवाराने आजची परिस्थिती पाहता वाढते आपघात,कोविड व गरजु रुग्णाला वेळीच रक्त मिळत नाही तर रक्तपेढ्यात रक्त तुटवटा भासत असल्याने रक्तदान शिबीराचे आयोजन करून या मोहीमेत अतिदुर्गम भागातील जवळपास शंभर दात्यांनी रक्तदान केले. रक्त संकलन ,संकल्प ब्लड बँक कल्याण यांनी केले यावेळी शिबीरास टोकावडे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे, पंचायत समिती उपसभापती अरुणा खाकर, पं. स. सदस्या सीमा घरत, वाल्हीवरेचे सरपंच रघुनाथ खाकर यांनी शिबीरास भेट दिली.

You might also like