देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पोलीस साहित्य संमेलन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – खाकी वर्दीतील पोलीस नेहमीच सामान्य नागरिकांच्या संरक्षणासाठी २४ तास काम करीत असतात. मग ऊन, वारा, पाऊस काही असो हा पोलीस नावाचा माणूस सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असतो. पण कणखर असलेल्या या खाकी वर्दीत एक कलाकार दडलेला असतो. एरव्ही नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी खांद्यावर घेऊन व ड्युटी असलेले पोलीस आता कविता, कथा ,चारोळी म्हणताना दिसणार आहेत.

पहिल्यांदाच पोलीस साहित्य संमेलन

विशेष म्हणजे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पोलीस साहित्य संमेलन भरवण्यात येणार आहे. येत्या २५ फेब्रुवारी रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एक दिवसीय पोलीस साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात १७० पोलीस सहभागी होणार असून यात कॉन्स्टेबलपासून अप्पर महासंचालाकांपर्यंतचे अधिकारी आपले साहित्य विचार मांडणार आहेत