‘या’ लोकसभा मतदार संघात काँग्रेसच्या यादीत असू शकते राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचे नाव 

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबाद व जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचाच उमदेवार असणार आहे . पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. जालना मतदारसंघात मी व डॉ. कल्याण काळे यांच्यापैकी कुणालाही उमेदवारी मिळाली तरी आम्ही दोघांनी एकमेकांचे प्रचार प्रमुख बनून एकमेकाला निवडून आणण्याची हमी घेत आहोत. असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत म्हंटले आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याच दरम्यान, आमदार सुभाष झांबड हे माझे चांगले मित्र आहेत. पण मध्यंतरी मी बुथ कमिट्यांच्या प्रश्नावरून नाराज होतो. उमेदवारांच्या स्पर्धेत त्यांचे नाव पुढे आहे. नामदेव पवार यांचेही नाव चर्चेत आहे. मात्र औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार म्हणून रवींद्र बनसोड यांचे नाव घेतले जात होते. परंतु हे नाव आता मागे पडले आहे. त्यांना गंगापूर विधानसभा निवडणुकीच्या तिकिटाचे आश्वासन देण्यात आले आहे. असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांचेही नाव असू शकते. असेही त्यांनी म्हंटले. तसेच आमदार सतीश चव्हाण यांचे नाव चालेल का, असे विचारले असता, पक्षश्रेष्ठींनी त्यांना काँग्रेसचे तिकीट दिल्यास का नाही चालणार. असेही त्यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, मला किंवा सत्तार यांच्यापैकी जालन्याचे तिकीट कुणालाही मिळो आम्ही  यावेळी विजयश्री खेचून आणणारच आहोत. माझे आणि अब्दुल सत्तार यांचे वैयक्तिक भांडण नाही. औरंगाबादचे तिकीट मला मिळाल्यास जिंकून आणण्याची जबाबदारी जिल्हाध्यक्ष म्हणून सत्तार यांचीच राहील असे  सुभाष झांबड यांनी म्हंटले.

याचबरोबर, रावसाहेब दानवे यांना आम्ही चकवा देणारच आहोत. आम्हाला अर्जुन खोतकर यांचीही साथ मिळेल, असेही अब्दुल सत्तर यांनी म्हंटले आहे. तसेच,  वंचित बहुजन आघाडीच मतांपासून वंचित राहील. काँग्रेस आघाडीवर त्यांचा काहीही परिणाम होणार नाही. सारे मुस्लिम एमआयएमचे गुलाम नाहीत. औरंगाबादच्या एमआयएमच्या नेत्यांना हैदराबादेत चपराशासारखी वागणूक मिळते. असेही त्यांनी म्हंटले.

या पत्रकार परिषदेत नामदेव पवार, किरण पा. डोणगावकर, डॉ.पवन डोंगरे, तसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.