रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्य़टकांना पुढील दोन महिने बंदी

रायगड : पोलीसनामा ऑनलाईन

पावसाळ्यातील संभाव्य धोके ओळखून रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्य़टकांना पुढील दोन महिने बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांना दोन महिने कर्जत आणि खोपोलीतील पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. बंदीचे आदेश कर्जतच्या उपविभागीय दंडाधिकारी यांनी काढले आहेत.
[amazon_link asins=’B07B6SN496′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’40f3a436-813c-11e8-9936-771116fdda2f’]

कर्जत आणि खोपोली अनेक पर्यटनस्थळे पर्य़टकांना पावसाळ्यात खुणावत असतात. या पर्य़टन स्थळांना भेटी देणाऱ्या पर्य़टकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. परंतु काही अती उत्साही पर्यटक जीवघेणे स्टंट करत असतात. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता असते. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

५ जुलै ते ४ सप्टेंबर २०१८ या दरम्यान खोपोली आणि कर्जत परिसरातील पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी असणार आहे. तसेच धबधबे, धरण, नदी परिसरात पर्यटकांना बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजीचा सुर ऐकायला मिळत आहे.