मुंबई विद्यापिठ नामांतरासाठी किल्ले पुरंदरवर सह्यांची मोहिम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमीत्त सकल मराठी समाजाच्यावतीने मुबंई विद्यापिठास छत्रपती संभाजी माहाराजांचे नाव द्यावे या मागणीसाठी किल्ले पुरंदरवर सह्यांची मोहिम राबवण्यात आली. सदर मोहिमेस शंभुप्रेमींचा भरघोस प्रतिसाद लाभला. मोहिमेची सुरवात संभाजी महाराजांच्या प्रतिमेस वदंन करून करण्यात आली.

सदर मोहिमेत किल्ले पुरंदरवर जयंती निमीत्त आलेल्या विविध पक्ष संघटनेच्या कार्यकत्यांनी उत्साहाने भाग घेतला. दरवर्षी पुरंदरवर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते व त्यासाठी राज्यभरातून शंभुप्रेमी उपस्थित असतात. यावर्षीही मोठ्या प्रेरणादायी वातावरणात किल्ले पुरंदरवर जयंती साजरी करण्यात आली व या सह्यांच्या मोहिमेमुळे शंभुप्रेमींना एका कृती कार्यक्रमात भाग घेण्याची संधी मिळाली. गडावर जयंतीसाठी येणारे शंभुप्रेमी आर्वजून सह्यांच्या मोहिमेत सहभागी होत होते व या उपक्रमाला पाठींबा दर्शवत होते.

मागणी लावून धरणार – खारदार युवराज संभाजीराजे छत्रपती

सदर सह्यांच्या मोहिमेस छत्रपती घराण्याचे वंशज खासदार संभाजीराजे छत्रपती देखील उपस्थित होते. नामातंराच्या मागणीस जाहिर पाठींबा दर्शवत त्यांनी सहीही केली. त्याच बरोबर सदर मागणीचा पाठपुरावा आपण सरकारकडे करू असे जाहिर केले. प्रत्यक्ष खा. युवराज संभाजी महाराजांच्या उपस्थितीने शंभुप्रेमींचा उत्साह द्विगुणीत झाला.

सदर सह्याची मोहिमेचे आयोजन सकल मराठी समाजाचे समन्वयक मा. राजेश खडके, तोरणा गडाचे परवारी यांचे वंशज मा.अंकुश गायकवाड, मा. विश्वनाथ गायकवाड, महेंद्र गायकवाड भारीपचे पुणे शहर युवक अध्यक्ष विकास साळवे, सचिव मा. गणेश भोसले, संघटक मा. संजय सोनवणे, संभाजी बिग्रेडचे मा. सोंडकर, सामाजिक कार्यकर्ते मा. मराठे, भारिपचे मा. चौधरी, पुरंदर ग्रामस्थ व शंभुप्रेमी यांनी केले.

संभाजी बिग्रेडचा पाठिंब्याचा ठराव

मुबंई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेड यापुढे मागणी सरकारकडे करणार आहे. संभाजी ब्रिगेड च्या वतीने संभाजी महाराजांच्या 361 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मशाल उत्सवाच्या रूपाने मानवंदना देण्यात आली. या प्रसंगी कैलास वडघुले यांच्या वतीने संभाजी महाराज लिखित बुधभूषण ग्रंथाचे वाटप करण्यात आले. तसेच या प्रसंगी मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात यावे या सकल मराठी समाज्याचा मागणीला पाठिंबा असा ठराव संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला. या ठरावीची प्रत माननीय मुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सादर कार्यक्रमास संभाजी ब्रिगेड’चे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहर अध्यक्ष प्रशांत धुमाळ, मराठा सेवा संघाचे कैलास वडघुले, सिध्दार्थ कोंडाळकर, सौरभ भिलारे, सचिन जोशी, जयकर कदम, अजय पवार, मयूर शिरोळे, जोतिबा नरवडे, पुजा झोळे, सुजय कदम, दत्तात्रय खुटवड, महादेव मातेरे आदी उपस्थित होते.