‘सारथी’ संस्थेसाठी छत्रपती संभाजीराजेंचं आज पुण्यात ‘उपोषण’ !
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सारथी संस्थेची स्वायत्ता कायम राखण्याच्या मागणीसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे पुण्यात लाक्षणिक उपोषण करणार आहेत. थोड्याच वेळात ते सारथी संस्थेच्या कार्यालयाबाहेर उपोषण सुरू करणार आहेत. मराठा, कुणबी आणि कृषी क्षेत्रातील बहुजन समाजाच्या विकासासाठी सारथी संस्थेची स्थापना केली गेली आहे.
सारथी संस्थेला 9 महिने झाले आहेत. मराठा समाजातील मुलांना आर्थिक शैक्षणिक उन्नती मिळावी यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली होती. परंतु गेल्या काही महिन्यांपासून सरकारने अनेक निर्बंध यावर लादले आहेत. सारथी संस्था अस्तित्वात पुन्हा बहाल व्हावी यासाठी पीएचडीचे विद्यार्थी एकत्र येऊन आंदोलन करत आहेत. छत्रपती संभाजीराजे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
आज दिवसभर ते उपोषणाला बसणार आहेत. संभाजीराजे नागपूरमध्ये उद्धव ठाकरे तसेच इतर काही मंत्र्यांना भेटले होते. परंतु सारथी संस्थेबाबत कोणताच निर्णय घेतला गेलेला नाही. या संस्थेबाबत सरकारने केलेले बदल अनेक विद्यार्थ्यांना मान्य नाहीत. गेल्या दोन महिन्यांपासून अनेक विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळालेली नाही. त्यांची आर्थिक अडचण वाढत आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलन केलं आहे.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- निराश व्यक्तीकडे वेळीच द्या लक्ष, ‘ही’ आहेत 4 लक्षणे, होऊ शकतो मृत्यू
- जास्त मीठाचे आहेत ‘हे’ 8 दुष्परिणाम, दोन हात लांबच राहा !
- मोबाईलचे ‘हे’ 7 दुष्परिणाम माहित आहेत का ? जाणून घ्या किती घातक !
- वृद्धांपेक्षाही तरुणांमध्ये जास्त ‘ही’ समस्या, या 7 महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या
- ‘एनर्जी ड्रिंक्स’ चे हे आहेत 4 तोटे, मुलांना अजिबात देऊ नका
- ‘मंकीपॉक्स’ आजाराची ‘ही’ आहेत 7 लक्षणे, वेळीच व्हा सावध !
- अळूची पाने आरोग्यासाठी वरदान! ‘हे’ 7 फायदे जाणून घ्या