….यासाठी मी एके-५६ जवळ बाळगली होती: संजय दत्त 

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन

मुंबई ब्लास्ट मध्ये संजय दत्तने मदत केली असेल का ? त्याने एके-५६ कोणत्या कारणासाठी बाळगली ? त्याचे अंडरवर्ल्डशी संबंध होते का? अशा अनेक प्रश्नांचा उलगडा करण्याचा प्रयत्न नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “संजु” सिनेमात काही प्रमाणात झाला असला तरी, अशा अनेक प्रश्नाबद्दल लोकांच्या मनात आणखीही संशय आहे. नुकत्याच  दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान संजय दत्तने स्वत:कडुन झालेल्या  चुका मान्य केल्या, तर काही गोष्टी उघडपणे बोलून दाखवल्या.
[amazon_link asins=’B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’22f6af30-8cf8-11e8-924c-9becc9b6b9b1′]

नुकताच संजय दत्तचा बायोपिक “संजू” प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने अधिराज्य गाजवत ३०० कोटींचा पल्ला गाठण्याबराेबरच अनेक विक्रमही माेडीत काढले. या सिनेमात संजय दत्तच्या जीवनावर प्रकाश टाकलेला आहे. यानंतरही काही गोष्टींबद्दल लोकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु झाल्या. सिनेमा प्रदर्शनानंतर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. काहींनी टीका केली तर काहींना चित्रपट गृहात अश्रू अनावर झाले.

संजय दत्त म्हणाला ‘माझ्या जीवनात ज्या गोष्टी घडल्या त्याबद्दलची माहिती मी चित्रपट दिग्दर्शकांना दिली. त्यामुळे चित्रपटात कोणत्या गोष्टी घ्यायच्या आणि कोणत्या नाही हे दिग्दर्शकांना ठरवण्याचा अधिकार होता. ‘माझं सत्य जगासमोर यावं यासाठी माझी पत्नी मान्यताने माझ्यावर चित्रपट यावा असा निर्णय घेतला होता. तेंव्हा मी तुरुंगात शिक्षा भोगत होतो. ‘बंदूक जवळ बाळगणे ही माझी सर्वात मोठी चूक होती’, हे मान्य करतो असे संजय दत्तने यावेळी सांगितल.
[amazon_link asins=’B075MGJY8Q’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2b60c44a-8cf8-11e8-b47d-6962e1845d0c’]

संजय दत्त पुढे म्हणाला, ‘एके-५६ जवळ बाळगण्याचा परिणाम मी चांगलाच भोगला असून याच एके-५६ मुळे माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले. मी दहशतवादी नाही. कृपा करुन माझा माफीनामा एकदा सर्वांनी वाचा. मी माझ्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी एके-५६ जवळ बाळगली हाेती असे त्यानी सांगितले.