‘या’ कारणामुळं फार्मा कंपनीच्या संचालकास मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं, दिलं अधिकृतरित्या स्पष्टीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत असून यावरुन राज्य आणि केंद्र सरकारमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. यादरम्यान रेमडेसिवीरचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतलं. या कारवाईची माहिती मिळताच विधासनभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मुंबई पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांची भेट घेत जाब विचारला. यावरून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी भाजपवर हल्ला चढवला.

आता या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मुंबई पोलीसांचे जनसंपर्क अधिकारी एस. चैतन्य यांनी सांगितले की, मुंबई पोलिसांकडे फार्मास्युटिकल कंपनीने मोठ्या प्रमाणात (60 हजार कुप्या) रेमडेसिविर औषध साठवल्याची माहिती होती. भारत सरकारच्या रेमडेसिवीर या औषधाच्या निर्यातीवरील विद्यमान बंदीमुळे रेमडेसिवीरचा हा साठा निर्यात करता आला नाही. कोव्हिड-19 पॉझिटिव्ह रुग्णांसाठी हे औषध उपयोगी पडते.

एस. चैतन्य यांनी माहिती देताना सांगितले की, विशेष माहितीनुसार कारवाई करताना 17 एप्रिल रोजी संबंधित कंपनीच्या संचालकास बीकेसी पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले होते. बीकेसी पोलीस ठाण्यात अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) पथक होते. एफडीएच्या आयुक्तांनी याची कल्पना होती. त्याच दिवशी रात्री सव्वा अकरा वाजता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रवीण दरेकर आमदार पराग अळवणी आणि प्रसाद लाड यांनी पोलीस ठाण्याला भेट दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी फार्मास्युटिकल कंपनीच्या संचालकांना पोलीस स्टेशनमध्ये कशासाठी बोलावले याची चौकशी केली. ते म्हणाले की, रेमडेसीवीर कुपींचा साठा महाराष्ट्र शासनास देण्यास एफडीए आयुक्तांकडून परवानगी घेण्यात आली होती. कारण निर्यातीसाठी ठेवलेला रेमडेसिविर ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया किंवा एफडीआय यांच्या परवानगी शिवाय स्थानिक बाजारात वळवता येत नाही.

एफडीएकडून फर्मास्युटिकल कंपनीला दिलेली माहिती बीकेसी पोलीस ठाण्यास कळवण्यात आली नाही. जे त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीवर स्वतंत्रपणे वागत होते. मुंबई पोलिसांनी सद्भावनेने आपले काम केले आहे. तथ्यांद्वारे विशिष्ट माहितीच्या आधारावर जीवनरक्षक औषध रेमडेसिवीरची 60 हजार कुपी शोधण्यासाठी संबंधित कंपनीच्या संचालकांना बोलावण्यात आले होते. रेमडेसिव्हिरच्या बेकायदेशीर होर्डिंग्ज, काळ्याबाजाराच्या तक्रारी आणि नागरिकांना होणारी टंचाई या तक्रर प्राप्त झाल्याने ही चौकशी आवश्यक होती. याची वस्तुस्थिती विरोधी पक्षनेते यांना समजावून सांगण्यात आली. बेकायदेशीर रेमडेसिविर होर्डिंग्ज लावणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची माहिती त्यांना देण्यात आली. यावेळी मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी हजर होते. यानंतर संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्याकडे चौकशी करुन त्यांना सोडण्यात आले. तसेच ज्यावेळी चौकशीसाठी बोलावण्यात येईल त्यावेळी हजर राहण्यास सांगितल्याची माहिती, एस. चैतन्य यांनी दिली.