2 वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणारा जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात मागील दोन वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या एकाला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

ललीत बिभीषण शिंदे (तळजाई पठार, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललीत शिंदे याच्याविरोधात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. दोन वर्षांपासून तो पसार झाला होता. तो वारंवार पत्ता बदलून पोलिसांना हुलकावणी देत होता. त्यामुळे त्याच्या पत्त्यावर जाऊन तपासणी करत असताना तो मिळून येत नव्हता. पोलीस कर्मचारी दुधाने आणि देवकाते यांनी त्यांच्या खास बातमीदारामार्फत व परिसरात लक्ष ठेवून मिळालेल्या माहितीनुसार ताब्यात घेतले. तपासी अधिकारी मपोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी त्याला दाखल गुन्ह्यात अटक केली.