कोनोर मॅकग्रेगर बनला सर्वात जास्त पैसे कमावणारा अ‍ॅथलीट, लियोनल मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डोला मागे टाकले

नवी दिल्ली : फोर्ब्जने बुधवारी जगातील 10 श्रीमंत अ‍ॅथलीट्सची यादी प्रसिद्ध केली. या यादीनुसार, आयर्लंडचा दिग्गज मिक्स्ड मार्शल आर्ट फायटर कोनोर मॅकग्रेगर जगात सर्वात जास्त कमाई करणारा अ‍ॅथलीट आहे. कोनोर मॅकग्रेगर यावर्षी सर्वात जास्त सॅलरी मिळणारा खेळाडू होता. मागच्या वर्षी तो 16 व्या स्थानावर होता. कोनोर मॅकग्रेगरने दिग्गज फुटबॉलर लियोनल मेसी, क्रिस्टियानो रोनाल्डो आणि स्टार टेनिस खेळाडूंच्या यादीज सहभागी रोजर फेडररला मागे टाकले.

फोर्ब्जनुसार, कोनोर मॅकग्रेगरची कमाई 1325 कोटी रुपये आहे. त्याच्यानंतर मेसीचा नंबर आहे. मेसीची कमाई 130 मिलियन डॉलर आहे. मॅकग्रेगरच्या कमाईपेक्षा 50 मिलियन डॉलर कमी आहे. तर रोनाल्डोची कमाई 120 मिलियन डॉलर आहे. या यादीत सातवेळा एफ-1 वर्ल्ड चॅम्पियन झालेला लुईस हॅमिल्टनचा सुद्धा समावेश आहे. ही पहिली वेळ आहे जेव्हा मॅकग्रेगर फोर्ब्जच्या यादीत टॉपवर आहे. मॅकग्रेगरच्या कमाई बाबत बोलायचे तर त्याने 158 मिलियन डॉलर सुमारे 1162.68 कोटी रुपये जाहिरात आणि व्हिस्की ब्रँडद्वारे कमावले.

 

 

 

अर्जेंटीनाच्या मेसीबाबत बोलायचे तर मागील वर्षी तो तिसर्‍या नंबरवर होता. यावेळी त्याने रोनाल्डोला मागे टाकले आहे. रोनाल्डोने बुधवारीच युव्हेंटससाठी आपला 100वा गोल केला आहे. रोनाल्डने 120 मिलियन डॉलरपैकी 50 मिलियन डॉलर जाहिरातीद्वारे कमावले आहेत. दोनवेळा युएफसी चॅम्पियन मूकग्रेगर फोर्ब्जच्या वार्षिक यादीनुसार 2020 मध्ये 100 मिलियनपेक्षा जास्त कामाई करणार्‍या खेळाडूंमध्ये सहभागी चार खेळाडूंपैकी एक आहे. कोनोर मॅकग्रेगरने फोर्ब्जच्या 10 श्रीमंत लोकांच्या यादीत दुसर्‍यांदा स्थान पटकावले आहे. 2018 मध्ये तो चौथ्या नंबरवर होता. ब्राझीलचा फुटबॉलर नेमार ला सुद्धा यादीत स्थान मिळाले आहे.