Forbes 30 Under 30 List | मराठीचा डंका जगभरात ! मूळची बारामतीकर आर्या तावरे या लंडनस्थित मराठी तरुणीचा ‘फोर्ब्स’ च्या यादीत समावेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Forbes 30 Under 30 List | केवळ 22 व्या वर्षी ‘स्टार्टअप’ सुरू करून ब्रिटनमधील लघू व मध्यम बांधकाम व्यावसायिकांना निधी उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्रातील मूळच्या बारामतीमधील (Baramati) आर्या तावरे (Arya Taware) या लंडनस्थित मराठी तरुणीच्या कामगिरीची दखल ‘फोर्ब्स’ (Forbes) या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित मासिकाने घेतली. ‘फोर्ब्स’ च्या युरोपमधील वित्तपुरवठा वर्गवारीतील 30 वर्षांखालील पहिल्या तीस व्यक्तींच्या यादीमध्ये (Forbes 30 Under 30 List) आर्याचा समावेश झाला आहे.

 

आर्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक कल्याण तावरे (Kalyan Taware) यांची मुलगी आहे. कुटुंबाच्या बांधकाम व्यवसायाच्या पार्श्वभूमीमुळे आर्याला वास्तूकला व नियोजन विषयात आवड निर्माण झाली. बारामतीतून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर तिने युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून (University College London) ‘अर्बन प्लॅनिंग अँड रिअल इस्टेट फायनान्स’ या विषयात पदवी घेतली. (Forbes 30 Under 30 List)

दरम्यान, विद्यापीठामधून उत्तीर्ण झाल्यावर आर्याने ‘फ्युचर ब्रिक्स’ (Future Bricks) नावाने ‘स्टार्टअप’ (Start Up Company) सुरू केला. या ‘स्टार्टअपद्वारे यूकेमधील लघू व मध्यम आकाराच्या बांधकाम व्यावसायिकांना निधी उपलब्ध करून दिला जातो. ‘आर्याचा स्टार्टअप वेगाने विस्तारत असून, तिच्या कंपनीचे मूल्य 350 – 400 कोटींवर पोहोचले आहे. अनेक मोठ्या वित्तपुरवठा कंपन्या तिच्या कंपनीशी जोडल्या गेल्या आहेत. त्याची दखल ‘फोर्ब्स’ मासिकाने घेतली असून, त्यांच्या यादीतील युरोपीय व्यक्तींमध्ये ती एकमेव आशियाई वंशाची तरुणी आहे,

”या यशाबद्दल आर्या, तिचे आई – वडील आणि मार्गदर्शक यांचे हार्दिक अभिनंदन. आर्याला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.” असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी म्हटलं आहे. तसेच, ”लंडनमध्ये काम करताना तेथील व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणी, कमी पडणारा निधी, याचा अचूक अभ्यास करुन आर्या हिने ‘फ्यूचरब्रीक’ ही कंपनी स्थापन करून या कंपनीच्या माध्यमातून त्यावर मार्ग काढला. तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !,” असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी कौतुक केलं आहे.

 

Web Title :- Forbes 30 Under 30 List | arya taware founder ceo at futurebricks named in forbes 30 under 30

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा