सलग 12 व्या वर्षी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले मुकेश अंबानी, इथं वाचा Forbes India यादी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फोर्ब्स इंडिया मासिकाने भारताच्या पहिल्या 100 श्रीमंत व्यक्तींची नवीन यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये पुन्हा एकदा रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी अव्वल स्थानी आहेत. विशेष म्हणजे फोर्ब्स इंडियाच्या भारतातील 100 श्रीमंत व्यक्तींच्या नावांमध्ये मुकेश अंबानी सलग 12 वर्ष प्रथम स्थानी आहेत.

त्यांची एकूण संपत्ती 3.64 लाख कोटी रुपये (51.4 बिलियन) आहे. त्यांच्या संपत्तीत 28.4 कोटींची (4 मिलियन अमेरिकी डॉलर) वाढ झाली आहे. त्याचबरोबर गौतम अदानीने 8 क्रमांकांनी मोठी झेप घेत या यादीत दुसरे स्थान मिळविले आहे. याशिवाय उदय कोटक यांनी प्रथमच टॉप 5 मध्ये स्थान मिळवले आहे.

फोर्ब्सच्या या यादीमध्ये स्टील निर्माता आर्सेलर कंपनीचे मालक लक्ष्मी मित्तल यांचा क्रमांक या यादीमध्ये लक्षणीय खाली आला आहे. मागील वर्षी या यादीत तिसर्‍या क्रमांकावर असलेले लक्ष्मी मित्तल 6 स्थान घसरून 9 व्या स्थानावर आले आहे. फोर्ब्स इंडियाच्या म्हणण्यानुसार, स्टीलची मागणी आणि किंमतीतील घसरण यामुळे हे घडले आहे. मागील वर्षी यादीत दुसऱ्या स्थानावर असणारे अझीम प्रेमजी यावेळी टॉप 10 मध्येही नाहीत.

देशातील पहिल्या 10 श्रीमंतांची यादी –

मुकेश अंबानी: 5140 कोटी डॉलर (सुमारे 3.64 लाख कोटी रुपये)

गौतम अदानीः 1570 कोटी डॉलर (सुमारे 1.11 लाख कोटी रुपये)

हिन्दुजा ब्रदर्स: 1560 कोटी डॉलर ( सुमारे 1.10 लाख कोटी रुपये)

पी मिस्त्री: 1500 कोटी डॉलर ( सुमारे 1.06 लाख कोटी रुपये)

उदय कोटक: 1480 कोटी डॉलर ( सुमारे 1.05 लाख कोटी रुपये)

शिव नाडर: 1440 कोटी डॉलर ( सुमारे 1.02 लाख कोटी रुपये)

राधाकृष्णन दमानी: 1430 कोटी डॉलर ( सुमारे 1.01 लाख कोटी रुपये)

गोदरेज फॅमिली : 1200 कोटी डॉलर ( सुमारे 85,200 कोटी रुपये)

लक्ष्मी मित्तल: 1050 कोटी डॉलर ( सुमारे 74,550 कोटी रुपये)

कुमार मंगलम बिर्ला : 960 कोटी डॉलर ( सुमारे 68,160 कोटी रुपये)

 

visit : Policenama.com