Forbes List : ‘सलमान’ आणि ‘शाहरूख’ला पाठीमागे टाकल्यानंतर नंबर 2 वर राहिला ‘खिलाडी’ अक्षय कुमार, नंबर 1 कोन ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फोर्ब्स इंडियाने 2019 च्या 100 नामांकित व्यक्तींची वार्षिक यादी जाहीर केली आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार दुसर्‍या स्थानावर असून सलमान खान तिसर्‍या क्रमांकावर आहे. तर क्रिकेटर विराट कोहली यांने अव्वल स्थान पटकावले आहे. आलिया भट्ट आणि दीपिका पादुकोण पहिल्या दहापैकी दोन महिला आहेत. ही रँकिंग 1 ऑक्टोबर 2018 ते 30 सप्टेंबर 2019 पर्यंतच्या ख्यातनाम व्यक्तींच्या अंदाजित कमाई आणि कीर्तीवर आधारित आहे.

अक्षय कुमारची कमाई 293.25 कोटी :
या काळात अक्षय कुमारने 293.25 कोटींची कमाई केली. तो फोर्ब्सच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, कमाईच्या बाबतीत तो अव्वल क्रमांकावर आहे. मागील वर्षाच्या तुलनेत त्यांची कमाई 58.51 टक्क्यांनी वाढली आहे. 229.25 कोटींच्या कमाईसह सलमान खान तिसऱ्या स्थानावर आहे.

‘महानायक’ अमिताभ बच्चन यांनी 239.25 कोटी कमाई करून चौथ्या क्रमांकावर आणि भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी 135.93 कोटींच्या कमाईसह पाचव्या क्रमांकावर आहे. अभिनेता शाहरुख खान 124.38 कोटींच्या कमाईसह सहाव्या तर रणवीर सिंग 118.2 कोटी रुपयांश सातव्या क्रमांकावर आहे.

विराट कोहलीची कमाई खूप जास्त :
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली लोकप्रियतेच्या आधारे या यादीत अव्वल स्थान मिळविण्यात यशस्वी झाला. यावेळी त्यांनी 252.72 कोटी रुपये कमावले.

दरम्यान, यावेळी केवळ दोन महिलांनी प्रथम दहामध्ये स्थान मिळविले. अभिनेत्री आलिया भट्ट 59.21 कोटींच्या कमाईसह आठव्या तर दीपिका 48 कोटी सह दहाव्या स्थानावर आहे. तर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर 76.96 कोटी रुपयांच्या कमाईसह नवव्या स्थानावर आहे. यावर्षीच्या यादीमध्ये दक्षिण भारतीय चित्रपटांतील तार्‍यांचेही चांगले प्रतिनिधित्व होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/