अल्पवयीन मुलीचा भर रस्त्यात विनयभंग करणाऱ्याला सक्तमजुरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

शाळेला निघालेल्या नात्यातील अल्पवयीन (वय-१४) मुलीला भर रस्त्यामध्ये अडवून प्रेमसंबंध का ठेवत नाही अशी विचारणा करुन विनभंग करणाऱ्या आरोपीला  ३ वर्षे सक्तमजुरी आणि दीड हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.के. कऱ्हाडे यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त 1 महिना कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’56fd1368-9cc0-11e8-84a9-b3f728a4d917′]
रवींद्र दत्तु जगताप (वय 21, रा. चांदखेड, ता. मावळ) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित 14 वर्षीय मुलीने तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील राजेश कावेडीया यांनी काम पाहिले. त्यांनी तीन साक्षीदार तपासले. त्यामधे पीडित मुलगी, तिच्या आईची साक्ष महत्त्वाची ठरली. ही घटना 28 नोव्हेंबर 2015 च्या पूर्वीच्या दीड महिन्याचा कालावधीत घडली.

पीडित मुलीचे आई-वडिल विभक्त राहतात. ती आईसोबत गहुंजे येथे राहते. घटनेच्या वेळी ती शिवाजी विद्यालय देहुरोड येथे आठवीत शिकत होती. ती शाळेला पायी जात-येत असत. शाळेला जाताना प्रेमसंबंध का ठेवत नाही, अशी विचारणा केली. याबाबत पीडितेने आईला सांगितले. आईने रवींद्र याला जाब विचारला असता त्याने त्यांना शिवीगाळ करत दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5c890f1c-9cc0-11e8-9775-abd086fe7e8a’]

या प्रकरणात पोलिसांनी तपास करून विनयभंग, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दोषारोपपत्र दाखल केले. यावर सुनावणी करत न्यायालयाने भादवी कलम 354 (विनयभंग) नुसार 3 वर्षे सक्तमजुरी आणि 1 हजार रुपये दंड, तर भादवी कलम 506 (धमकाविणे) नुसार 3 महिने कारावास आणि 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली.