मोदींवरील लघुपट शाळांमध्ये दाखविण्याची सक्ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील लघुपट शाळांमध्ये दाखविण्याचा फतवा राज्य सरकारने काढला आहे. चलो जीते है असे या लघुपटाचे नाव आहे. हा लघुपट विद्यार्थ्यांना दाखवण्यास काही राज्यांनी नकार दिल्यानंतर वादंग उसळला होता. आता याच लघुपटाचा तास महाराष्ट्रातील शाळांमध्ये दाखविण्यासाठी सक्ती करण्यात आली आहे. देशातील सर्व पेट्रोल पंपांवर मोदींचे छायाचित्र झळकविण्याचा फतव्यामुळे काही दिवसांपूर्वीच वाद निर्माण झाला होता. आता या लघुपटाच्या सक्तीवरूनही वाद निर्माण होण्याची शक्यता.
[amazon_link asins=’B00SAX9X6G’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’36db43c6-b648-11e8-9361-cb7b9ebe1d8e’]

हा ३२ मिनिटांचा लघुपट मंगेश हडवळे यांनी दिग्दर्शित केला असून जुलै महिन्यात तो केंद्रीय मंत्रिमंडळानेही पाहिला. त्यानंतर विद्यार्थ्यांना तो दाखवणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र विद्यार्थ्यांना अशा प्रचारतंत्रात का ओढले जात आहे, असा सवाल काही शिक्षकांनी केला आहे. केंद्रप्रमुख, शिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांना व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून याबाबत सूचना दिल्या आहेत. मंगळवार १८ सप्टेंबररोजी हा लघुपट एका संकेतस्थळावर प्रदर्शित होणार आहे. तो सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत शाळांमध्ये दाखवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सर्व शाळांनी या लघुपटाच्या प्रक्षेपणासाठी लॅपटॉप किंवा डेस्कटॉप कम्प्युटरची सोय करायची आहे. त्याचबरोबर किमान एक एमबीपीएस वेग असलेले इंटरनेट जोडणी असणे आवश्यक आहे. तर प्रोजेक्टर व स्क्रीन आणि स्पीकर्सची व्यवस्था करण्याचे आदेशही शाळांना देण्यात आले आहेत. दरम्यान, अशा कोणत्याही सूचना शाळांना आमच्याकडून देण्यात आलेल्या नाहीत, असे शिक्षण विभागाने म्हटले आहे. लघुपटाची सक्ती केलेली नाही किंवा तसे लेखी पत्रही नाही. मात्र, शिक्षण विभागाचा कारभार हा हल्ली बहुतांशी व्हॉट्सअ‍ॅपवरूनच चालतो. त्यावरून वरिष्ठ सूचना देतात तेव्हा त्या शाळांना पाळाव्याच लागतात, असे एका शिक्षकांनी सांगितले.
[amazon_link asins=’B077RV8CCY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3d33de21-b648-11e8-8a8f-c7b7d21fe003′]

नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत. त्यांना हवे तेव्हा ते जनतेशी थेट संवाद साधू शकतात. त्यासाठी ते मन की बात सारखे कार्यक्रमही करतात. मात्र, त्यांच्यावरील लघुपटाची सक्ती विद्यार्थ्यांवर करणे अत्यंत चुकीचे आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन आपल्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठीच सरकारने हा निर्णय घेतला आहे. आधीच सणासुदीच्या सुट्या, शिक्षकांवर लादले जाणारे अन्य उपक्रम यामुळे शिक्षणावर परिणाम होत आहे. या लघुपटाच्या प्रक्षेपणामुळेही शैक्षणिक कामकाजाचे नुकसान होणार आहे. सरकारने त्वरित हा निर्णय रद्द करावा, अशी प्रतिक्रिया शिक्षकांकडून व्यक्त होत आहे.

काहीही झाले तरी आगामी निवडणुका आम्हीच जिंकणार : अमित शाह