संतापजनक ! पती, सासूकडून अल्पवयीन विवाहितेच्या पोटात लाथा बुक्यांनी मारहाण, जबरदस्तीने घडविला गर्भपात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अल्पवयीन असल्याचे माहिती असताना तिच्याशी लग्न केले. त्यानंतर ती गर्भवती राहिली असताना तिच्या पोटावर मारुन जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याचा प्रकार हवेली तालुक्यातील वडगाव शिंदे हे घडला आहे.

याप्रकरणी चिखली पोलिसांनी पती अक्षय धनाजी जाधव (वय २४, रा. जाधववस्ती, वडगाव शिंदे, ता. हवेली), सासू पुष्पा धनाजी जाधव (वय ४५), सासरे धनाजी किसन जाधव (वय ४५), पतीची आत्या रुक्मिणी पांडुरंग गायकवाड (वय ५५, रा. गायकवाड वस्ती, मोशी), नणंद आश्विनी गणेश गायकवाड (वय २६) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पती अक्षय जाधव व सासू पुष्पा जाधव यांना अटक केली आहे.

याप्रकरणी १७ वर्षाच्या विवाहितेने फिर्याद दिली आहे. या तरुणीचे वय कमी असताना त्यांच्या आई वडिलांवर अक्षय जाधव यांच्या नातेवाईकांनी मानसिक दबाव आणून एप्रिल २०१८ मध्ये लग्न लावून दिले. ती अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही अक्षय याने तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. तिला मानसिक व शारीरिक त्रास होत असल्याने तिने अनैसर्गिक कृत्य करण्यास विरोध केला तर, तो तिला शिवीगाळ करुन मारहाण करीत असे.

दरम्यान, ती गर्भवती राहिली. त्यामुळे त्रास होत असल्याने तिने अक्षय याला शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने अक्षय याने तिच्या पोटात लाथ मारली. सासू व सासरे व नणंद यांनी आम्हाला हे मुल नको, म्हणून तिला उपाशी ठेवून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे गर्भातील मुलाचा मृत्यु झाल्याने तिला गर्भवात करावा लागला.

या प्रकारामुळे त्यांनी तिला माहेरी पाठवून दिले. त्यानंतर जर तुमच्या मुलीला नांदविण्यासाठी पाठवायचे असेल तर २५ लाख रुपये द्या, असे म्हणून तिचा मानसिक छळ केला, असे या विवाहितेने फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस ठाण्याचे महिला पोलीस उपनिरीक्षक आर. टी. सावंत अधिक तपास करीत आहे.

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा