हातच नव्हे तर कपाळावरील रेषांचंही असतं ‘किस्मत कनेक्शन’, सांगतात कसं राहिल तुमचं ‘भाग्य’

नवी दिल्ली : भारतीय ज्योतिष्याची अनेक रुपं आहेत. यामध्ये एक प्राचीन विद्या आहे ती म्हणजे समुद्र शास्त्र. यामध्ये शरीरातील विविध अवयवांचा अभ्यास केल्यावर व्यक्तीच्या चरित्र आणि येणाऱ्या भविष्याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात.

साधारणपणे हात पाहिल्यानेच आपल्या भविष्यातील पुढची भविष्यवाणी केली जाते. पण आता फक्त हातच नाही तर कपाळावरील रेषांचं ‘किस्मत कनेक्शन’ आहे.

काय सांगतात कपाळावरील रेषा

रेषा फक्त माणसाच्या हातावर नाही तर कपाळावरही असतात. काहींच्या कपाळावर स्पष्टपणे दिसतात तर काहींच्या कपाळावर अत्यंत हलक्या प्रमाणात दिसतात.

बुध रेषा : या रेषांचे स्थान कपाळाच्या मधोमध असते. अशाप्रकारच्या रेषा असणारे लोक बुद्धीमान आणि उत्तम स्मरणशक्ती असलेली असतात. तसेच पैशांबाबत सतर्क असतात.

शुक्र रेषा : बुध रेषेच्या अगदी खाली फक्त मध्य भागात या रेषा असतात. असे लोक नशीबवानासह उत्साह आणि एनर्जीने भरलेले असतात.

मंगळ रेषा : शुक्र रेषेच्या थोड्या वरच्या बाजूला मंगळ रेषा मधोमध असते. आणि या रेषादेखील कपाळाच्या मधोमध असतात. हे लोक मनाने साफ असतात. मात्र, त्यांना लवकर राग येतो.

गुरु रेषा : शुक्र आणि मंगळ रेषेच्या वर ही गुरु रेषा असते. हे लोक आधात्मिक प्रवृतीचे असतात. असे लोक अनेकदा जिद्दीही असतात.

शनि रेषा : गुरु रेषेवर आणि कपाळाच्या अगदी वर शनि रेषा असते. हे असे असल्याने व्यक्ती श्रीमंत असल्याचे दिसत आहे. असे लोक कला क्षेत्रात नाव कमावतात.

चंद्र रेषा : चंद्र रेषा डोळ्याच्या वरच्या बाजूला असते. जर ही रेष तुटली नसेल तर संबंधित व्यक्ती श्रीमंत असल्याचे दिसते.

सूर्य रेषा : आयब्रोच्या वर ही सूर्य रेषा असते. जर व्यक्तीच्या कपाळावर ही रेषा स्पष्ट आणि खाली असली तर व्यक्तीचे नशिब चांगले असते.