पुण्याच्या लोहगाव विमानतळावर 39 लाखांचं विदेशी चलन पकडलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय सिमा शुल्क विभागाने बेकायदेशीररित्या विदेशी चलनाची तस्करी करणार्‍या दोघांना पकडले. तब्बल 38 लाख 79 हजारांचे विदेशी चलन जप्त करण्यात आले आहे. त्यामध्ये पाउंड, कतार रियाल आणि सौदी रियाल या विदेशी चलनाचा समावेश आहे.

अन्सारी फिरोज अब्दुल हमीद (वय 43, गुरुवार पेठ) आणि शेख मोहम्मद तारिक इकबाल अहमद (वय 33, कसबापेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अन्सारी आणि शेख हे दोघेही पुण्यातील रहिवासी आहेत. ते स्पाइस जेट विमानाने दुबई-पुणे असा प्रवास करत होते. विमानतळावर उतरल्यानंतर त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याच्या दिसून आल्या. त्यानंतर सीमा शुल्क विभागाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, दोघांच्या पँटमध्ये पाउंड, कतार रियाल आणि सौदी रियाल विदेशी चलन असल्याचे दिसून झाले.

हिंदुस्थानी चलनातील 38 लाख 79 हजार रुपयांचे विदेशी चलन जप्त करीत कस्टम विभागोन त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी अशा प्रकारे यापूर्वी चलनाची तस्करी केली होती का ? विदेशी चलन कोणाला देणार होते याचा तपास केला जात असल्याचे सीमा शुल्क विभागाच्या सहआयुक्त वैशाली पतंगे यांनी सांगितले.