आणखी एक Good News ! डॉलरनं ‘विक्रमी’ पातळीवर पोहचला देशातील खजिना

नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेत सुधारणेच्या संकेतादरम्यान आणखी एक चांगली बातमी समोर आली आहे. कोरोना संकटात परदेशी चलन साठ्यातून देशाचा खजिना भरला आहे. परदेशी चलन साठा आतापर्यंतच्या सर्वात उच्चत स्तरावर पोहचला आहे. केंद्र सरकारसाठी हे एक मोठे यश आहे.

कोरोना संकटामुळे मागील दोन क्वार्टरमध्ये आर्थिक मोर्च्यावर अनेक झटके बसले आहेत, परंतु या दरम्यान परदेशी चलन साठा लागोपाठ वाढत गेला आहे. देशाचा परदेशी चलन साठा 6 नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्यादरम्यान 7.779 बिलियन डॉलरवरून वाढून 568.494 बिलियन डॉलरच्या स्तरावर पोहचला.

परदेशी चलन साठ्याने प्रथमच 568 बिलियन डॉलरचा स्तर पार केला आहे, हा एक रेकॉर्ड आहे. यापूर्वी तो 30 ऑक्टोबरला हा 1.83 कोटी डॉलर मजबूत होऊन 560.715 अरब डॉलरवर होता. आरबीआयनुसार 6 नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्याच्या दरम्यान परदेशी चलन संपत्ती (एफसीए) मध्ये मोठ्या वाढीचा फायदा परदेशी चलन साठ्यावर दिसला, ज्यातून तो 568 बिलियन डॉलरच्या वर पोहचला.

पुनरावलोकन आठवड्यात परदेशी चलन संपत्ती 6.403 बिलियन डॉलरने वाढून 524.742 बिलियन डॉलरवर पोहचली. एफसीएमध्ये अमेरिकन डॉलरसोडून यूरो, पौंड आणि अन्य चलनांचा सहभाग असतो. याचा हिशेब सुद्धा डॉलरच्या मुल्यानेच होतो. तर या दरम्यान सुवर्ण साठ्याचे मुल्य 1.328 अरब डॉलरवरून वाढून 37.587 बिलियन डॉलरवर पोहचले.

5 जूनला 500 अरब डॉलरच्या पुढे
पाच जूनला संपलेल्या आठवड्यात पहिल्यांदा देशाचा परदेशी चलन साठा 500 अरब डॉलरच्या वर गेला होता. त्यावेळी तो 8.22 अरब डॉलरच्या जोरदार वाढीसह 501.70 अरब डॉलरवर पोहचला होता.

परदेशी चलन साठा वाढण्याचा अर्थ
परदेशी चलन साठ्यात वाढ कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगली बाब आहे. यामध्ये चलन म्हणून बहुतांश डॉलरच असतात. डॉलरद्वारेच जगभरात व्यवहार केला जातो. जेव्हा आपण एखाद्या देशाला काही विकतो, तेव्हा बदल्यात आपल्याला सुद्धा अमेरिकन डॉलर मिळतात. हेच कारण आहे की प्रत्येक देश आयातीपेक्षा निर्यात करण्यावर भर देतो, जेणेकरून त्याच्याकउे खर्चापेक्षा जास्त डॉलरचे उत्पन्न व्हावे.

30 वर्षापूर्वी 1991 मध्ये परदेशी चलन साठा शून्यावर होता. मागील तीन दशकात भारताने शून्यापासून शिखरापर्यंतचा मार्ग पार केला आहे. 1980-90 च्या दशकात भारताचा परदेशी चलन साठा रिकामा होत-होत अशा स्थितीत पोहचला होता की, 1991 मध्ये देशाला आपल्या सोन्याचा खजिना गहाण ठेवावा लागला होता.