Foreign Liquor Prices | इतर राज्यांतून मद्य आणल्यास कारवाई; परवानगीनंतरच विदेशी मद्याचे दर कमी होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Foreign Liquor Prices | राज्य सरकारकडून (Maharashtra Government) परदेशातून आयात केलेल्या मद्यावरील विशेष शुल्काच्या करात (Tax) घट करण्यात आले आहे. 300 टक्क्यांवरून 150 टक्के कमी केला आहे. सरकारने 18 नोव्हेंबरपासून हा नियम लागू केला आहे. आयात करणाऱ्या कंपन्यांना त्यांचे निर्मिती शुल्क (दर) उत्पादन शुल्क विभागाकडे (State Excise Department) द्यावे लागणार आहे. मंजुरीनंतर विदेशी मद्याची किंमत (Foreign Liquor Prices) निश्चित केली जाईल. हे काम या आठवड्यात पूर्ण होणार आहे.

 

विशेष शुल्काबाबत (Special charges) उत्पादन शुल्क आयुक्त कांतिलाल उमाप (state excise commissioner kantilal umap) यांनी ही माहिती दिली आहे. त्यावेळी ते म्हणाले, राज्य सरकारने विशेष शुल्कात मोठी कपात केली आहे. आता कंपन्यांना त्यांची स्वतःची किंमत जाहीर करावी लागेल. जाहीर केलेल्या किमतीची यादी त्यांना आयुक्तांकडे द्यावी लागेल. त्यांच्या परवानगीनंतर एमआरपी (MRP) निश्चित होईल. प्रत्येक कंपन्यांना नवीन बदल कळविण्यात आले आहेत. त्यांच्याकडून येत्या 2-3 दिवसांत याद्या येतील आणि मान्यतेनंतर महाराष्ट्रातही मद्याच्या किंमती (Foreign Liquor Prices) मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहेत.

 

कराच्या (Tax) या बोजामुळे महाराष्ट्रात दारू विकत घेणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. शिवाय दारूमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ करून ती विकली जाते. भेसळीची दारू पिणाऱ्याला गंभीर आजाराला सामोरे जावे लागत आहे. महसुली उत्पन्नावरही परिणाम होतो. तर, या निर्णयामुळे आयात मद्याचे दर कमी होऊन इतर राज्यांच्या बरोबरीत येतील. दर कमी झाल्यामुळे तस्करीला आळा बसणार आहे, असं एका वरिष्ठ अधिका-याने सांगितलं आहे.

 

दरम्यान, पुढे असं त्या संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले, परदेशातून येताना 2 लिटर दारू आणता येते.
पण, भारतात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात दारूची ने-आण करता येत नाही.
कायद्याने तो गुन्हा ठरतो. अनेक लोक दिल्ली, गोवा येथे दारू स्वस्त मिळते म्हणून तेथून घेऊन येतात.
हे थांबवण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने येत्या काही दिवसांत राज्यात मोठी मोहीम राबवली जाणार आहे.
बाहेरून दारू आणणाऱ्यांवर प्रसंगी गुन्हेही दाखल (Foreign Liquor Prices) केले जाणार आहेत.

 

महागड्या ब्रँडची किंमत –

महाराष्ट्र – 5,760
चंदीगड – 2,200
गोवा – 2,800
दिल्ली – 2,800
दीव-दमण – 3,000
पश्चिम बंगाल – 3,500

 

Web Title :- Foreign Liquor Prices | foreign liquor prices will fall only after permission action if alcohol imported other states state excise commissioner kantilal umap marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा