पाकिस्तानसोबत नाही तर ‘टेररिस्तान’सोबत बोलण्यास ‘अडचण’, परराष्ट्रमंत्र्यांचा इम्रान खानला’उपदेश’

न्यूयॉर्क : वृ्त्तसंस्था – भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पुन्हा एकदा आपल्या मातीतून दहशतवाद नष्ट करण्याची सूचना दिली आहे. भारताचे विदेश मंत्री एस जयशंकर म्हणाले, “भारताला पाकिस्तानची नाही तर टेररिस्तानशी बोलण्यास अडचण आहे. काश्मीर प्रश्नाला सामोरे जाण्यासाठी पाकिस्तानने संपूर्ण दहशतवादी उद्योग तयार केला आहे.”

 

India, Pakistan, Imran Khan, Terrorism, External Affairs Minister, S. Jaishankar, Kashmir, Terrorism

जयशंकर न्यूयॉर्कमध्ये आशिया सोसायटी या सांस्कृतिक संस्थेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचले होते. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले, “जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबत असलेले संबंध कमी केले होते आणि भारतीय उच्चायुक्तांनाही हद्दपार करण्यात आले होते.”

काश्मीरमधील बदललेली स्थिती चिंतेचा विषय असल्याचे सांगत चीनने म्हटले की, “संबंधितांना संयम बाळगायला हवा आणि सावधपणे काम करायला हवं. तणाव  वाढवणाऱ्या कोणत्याही कारवाईपासून वाचायला हवं.” यावर जयशंकर यांनी जोर देऊन म्हटले की, “भारताला पाकिस्तानशी चर्चा करण्यात अडचण नाही. आम्हाला टेररिस्तानसोबत बोलण्यास अडचण आहे. त्यांना पाकिस्तानच रहावं लागेल, इतर काही नाही.”

JAISHANKARR

पाकिस्तानने उभा केला आतंकवादाचा उद्योग

जयशंकर म्हणाले की, “जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढण्याच्या भारताच्या निर्णयानंतर पाकिस्तानला वाटते की, जर हे धोरण यशस्वी झालं तर 70 वर्षांची त्यांची गुंतवणूक तोट्यात जाईल. ‘आज, त्याचा प्रतिसाद रागाच्या, निराशेच्या रूपात समोर येताना दिसत आहे. कारण दीर्घकाळापासून तुम्ही आतंकवादाचा उद्योग सुरु केला आहे.”

Visit : policenama.com