2021 च्या सुरुवातीला FPI गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारावर वाढला विश्वास; 14,866 कोटींची गुंतवणूक

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (foreign portfolio investors)  जानेवारी महिन्यातही भारतीय बाजारात चांगली गुंतवणूक केली आहे. महिन्याच्या सुरूवातीला भारतीय बाजारात सुमारे 14,866 कोटींची गुंतवणूक झाली आहे. कंपन्यांचे तिसर्‍या तिमाही निकाल चांगले असल्याच्या अपेक्षे दरम्यान एफपीआयचे भारतीय बाजारपेठेकडे आकर्षण वाढले आहे. डिपॉझिटरीच्या आकडेवारीनुसार एफपीआयने (foreign portfolio investors)  1 ते 15 जानेवारी दरम्यान शेअर्समध्ये 18,490 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

याशिवाय कर्ज किंवा बाँड मार्केटमधून 3,624 कोटी रुपये काढले गेले आहेत. अशा प्रकारे त्यांची निव्वळ गुंतवणूक 14,866 कोटी रुपये झाली आहे. कोटक सिक्युरिटीजचे कार्यकारी उपाध्यक्ष व बेसिक रिसर्चचे प्रमुख रस्मिक ओझा म्हणाले की, तिसर्‍या तिमाहीच्या चांगल्या निकालामुळे एफपीआयची भूमिका उदयोन्मुख बाजारपेठेसाठी सकारात्मक आहे. याशिवाय देशात कोविड – 19 च्या संसर्गाचे प्रमाणही कमी झाले आहे, त्यामुळे एफपीआय भारतीय बाजारात गुंतवणूक करीत आहेत. ग्रोचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) हर्ष जैन म्हणाले की, पूर्वीचे गुंतवणूकदार निवडक मोठ्या शेयर्समध्ये गुंतवणूक करीत होते, परंतु त्यांचे मूल्यांकन वाढविल्यानंतर आता ते छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करीत आहेत.

दरम्यान, बाजारात सलग 5 दिवस जलद वाढीनंतर शुक्रवारी नफा बुकिंग पाहायला मिळाली. सेन्सेक्स-निफ्टी जोरदार घसरणीसह बंद झाला. व्यापार अखेर सेन्सेक्स 549.49 अंक म्हणजेच 1.11 टक्क्यांनी घसरुन 49,034 च्या स्तरावर बंद झाला. त्याचबरोबर निफ्टी 161.90 अंक म्हणजेच 1.11 टक्क्यांच्या कमजोरीसह 14433.70 च्या स्तरावर बंद झाला.