14 महिन्यांमध्ये अफगानिस्तानातून संपूर्ण लष्कर परत बोलवणार अमेरिका, तालिबानसोबत झाला करार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिका आणि तालिबानमध्ये शांतता करार झाला आहे, ज्यावर आज शनिवारी शिक्कामोर्तब झाले. याअंतर्गत निश्चित झाले की अमेरिका 14 महिन्याच्या आत अफगाणिस्तानमधून आपली सेना परत बोलावून घेणार आहे. हा करार कतारच्या दोहा शहरात झाला.

या कराराचे साक्ष बनण्यासाठी जगभरातील 30 देशातील प्रतिनिधी बोलवण्यात आले आहे, भारत देखील यात सहभागी आहे. कतारमध्ये भारताचे दूत पी कुमारन भारताकडून यूएसए – तालिबान यांच्यात झालेल्या शांतता करारावर स्वाक्षरी करतील.

ही पहिली घटना असेल ज्यात भारत तालिबान संबंधित एखाद्या करारात अधिकृतपणे सहभागी झाला. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री या करारावर स्वाक्षरी करणारे साक्षीदार बनले.

या करारानुसार दहशतवाद संपवण्याच्या बदल्यात अमेरिका अफगाणिस्तानातून आपले हजारो सैनिक परत बोलावण्यावर सहमती झाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानच्या लोकांना त्यांचे नवे भविष्य बनवण्याच्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.