महात्मा गांधींचे विचार दैनंदिन व्यवहारात अंमलात आणातायेत परदेशी विद्यार्थी

अहमदाबाद : वृत्तसंस्था – देशाच्या पुनर्रचनेसाठी तरुणांना तयार करण्याच्या उद्दीष्टाने १९२० मध्ये महात्मा गांधींनी स्थापन केलेली गुजरात विद्यापीठ केवळ विविध क्षेत्रात उच्च शिक्षण देत नाही तर विविध देशांमधून आलेल्या विद्यार्थ्यांना महात्मा गांधींच्या कल्पना शिकवित आहे. सण १९६३ पासून, गुजरात विद्यापीठाच्या डीम युनिव्हर्सिटीत पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडीचे शिक्षण दिले जाते, त्याशिवाय विशेषकरुन परदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘आंतरराष्ट्रीय कोर्स’ नावाचा गांधींच्या अहिंसेवर चार महिन्यांचा डिप्लोमा अभ्यासक्रम देखील चालवला जातो.

विविध देशांमधून येणारे विद्यार्थी बापूंची कल्पना आणि तत्त्वे शिकून त्यांच्या देशात परत जातील आणि त्यांच्या जीवनात या तत्वांचे अनुकरण करतील हे अभ्यासक्रमाचे लक्ष्य आहे. गांधी अभ्यास केंद्राचे समन्वयक प्रेम आनंद मिश्रा यांचे म्हणणे आहे की या अभ्यासक्रमामुळे अमेरिका, मेक्सिको, फ्रान्स, अर्जेंटिना, ब्राझील, घाना, दक्षिण सुदान आणि इंडोनेशिया येथून येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन बदलला आहे. हा डिप्लोमा २०११ मध्ये विद्यापीठाने सुरू केला होता.

चार महिन्यांच्या अभ्यासक्रमाचे उद्दीष्ट गांधींनी त्यांच्या खाजगी आणि सार्वजनिक जीवनात अंमलात आणलेल्या अहिंसेच्या सैद्धांतिक आणि व्यावहारिक बाबी शिकविणे हे आहे, असे कोर्स समन्वयक मिश्रा यांनी सांगितले. आतापर्यंत १५-१६ देशांमधील सुमारे ७० विद्यार्थ्यांनी हा कोर्स पूर्ण केला आहे.

प्रात्यक्षिक शिक्षणाला महत्त्व :
या अभ्यासक्रमात व्यावहारिकतेकडे बरेच लक्ष दिले जाते. विद्यार्थ्यांना जळगाव येथील गांधी रिसर्च फाउंडेशन आणि भावनगर येथील संपूर्ण क्रांती विद्यालय, लोक भारती अशा गांधींच्या विचारांशी संबंधित इतर संस्था आणि आश्रमात नेले जाते. त्यांना निसर्गोपचार केंद्रे आणि सेंद्रिय शेती केंद्रांना भेटीसाठी आणि अभ्यासासाठी नेले जाते. मिश्रा म्हणाले, विद्यार्थी या ठिकाणी पाच ते दहा दिवस राहतात, गोष्टी समजून घेतात, त्यांचा अभ्यास करतात आणि सराव मध्ये गांधीवादी विविध तत्त्वे लागू करतात. कोर्स पूर्ण करून घरी परत आलेले बरेच विद्यार्थी त्यांनी आपल्या देशात गांधीवादी तत्त्वे कशी लागू केली आहेत ते आम्हाला कळवतात.

Visit : Policenama.com