वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बंगळूरूमध्ये दिसला ‘डायनासॉर’ ! जाणून घ्या काय आहे प्रकरण

बंगळूर : वृत्तसंस्था – आज दुपारी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ऑफिसर प्रवीण कासवान यांनी डायनासोरचे एक चित्र शेअर करताना आपल्या ट्विटर फॉलोअर्सना आश्चर्यचकित केले आणि दावा केला कि हा बेंगळूरच्या हेब्बल तलावाचा फोटो आहे. चित्रात डायनासोर दिसत आहे. फोटोशॉप केलेला फोटो शेअर करत प्रवीण कासवान यांनी त्याला कॅप्शन दिले: “आता हेटर्स म्हणतील कि हे फोटोशॉप आहे. डायनासोर बंगळुरूच्या हेब्बल लेकमध्ये परत आले आहेत. लॉकडाऊनमुळे.” तर IFS अधिकाऱ्याने फोटोशॉप केलेला फोटो ट्विट करत बेंगळुरकडून दावा का केला? मिस्टर कासवान सध्या एका ट्रेंडमध्ये भाग घेत आहेत ज्याने गेल्या काही दिवसांत ट्विटरवर वादळ निर्माण केले आहे.

कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान हवा साफ झाली आहे आणि जालंधर येथून हिमालयाच्या दऱ्या दिसल्या होत्या. त्यानंतर लोकांनी नेचर इज हिलींग सह बरेच फोटोशॉप फोटो शेअर केले आहेत. कमी प्रदूषणामुळे सिडनीतून न्यूयॉर्क दिसत आहे, तर कोणाला दिल्लीतून मुंबईचे गेट वे ऑफ इंडिया. काहींना तर स्वच्छ हवा असल्यामुळे बाल्कनीतून देव दिसू लागला. लोकं मजेदार फोटोशॉप केलेले फोटो शेअर करत आहेत. प्रवीण कासवान यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केलेले चित्र पहा. ट्विट आता हटवले गेले असले तरी, आपण खाली असलेले चित्र पाहू शकता.

डिलीट व्हायच्या अगोदर हे फोटो मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले होते. याला काही तासातच जवळजवळ ३,००० लाइक्स आणि खूप साऱ्या कमेंट मिळाल्या.

जेव्हा एका ट्विटर युजरने म्हटले की, “हे पूर्णपणे नकली आहे… हे बंगळूर असू शकत नाही.”

तर कर्नाटक सरकारच्या जनसंपर्क शाखेने ट्विटरवर येऊन सांगितले कि डायनॉसॉर खरोखर शहरात परतले आहेत. मस्करीच्या उद्देशाने हे फोटो शेअर केले आहेत.

सोशल मीडियावर लोकं वेगवेगळ्या प्रकारचे फोटो पोस्ट करत आहेत, ज्यात लोकं मजेदार मिम्स शेअर करत आहेत. त्यातील हे काही फोटो आहेत –