मगरीच्या गळ्यात घातली दोरी, डोळ्यावर ‘रूमाल’ अन् त्यानंतर असं ताब्यात घेतलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातमधील बडोदामध्ये पावसात मगरींनी मोठे थैमान घातले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा मगरी बाहेर निघत असून सोमवारी रात्री देखील जवळपास साडेसहा फुटाची मगर नागरी क्षेत्रात घुसली. त्यानंतर तिला पकडण्यात यश आले असून हा परिसर अतिशय सुरक्षित समजला जातो.
magar

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री या परिसरात मगर शिरल्यानंतर स्थानिकांनी बचाव पथकाला पाचारण केले. त्यानंतर या बचाव पथकाने जवळपास दोन अडीच तासाच्या अथक परिश्रमानंतर या मगरीला पकडण्यात यश आले. सुरुवातीला या मगरीला पकडण्यासाठी तिच्या गळ्यामध्ये एक रस्सी टाकण्यात आली. त्यानंतर त्याला ओढत रस्त्यावर आणण्यात आले. तिच्या डोळ्यावर कापड टाकत चार व्यक्ती या मगरीच्या अंगावर बसल्या. त्यानंतर तोंडाला टेप गुंडाळण्यात आल्यानंतर तिला वनविभागाच्या हवाली करण्यात आले.

दरम्यान, याआधी पावसाळ्यात गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात मगरी आढळून आल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Visit : Policenama.com