नरभक्षक वाघिणीला ‘परफ्यूम’ने आकर्षित करणार, वन विभागाचा खटाटोप

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – यवतमाळमधील वनक्षेत्रालगतच्या एका नरभक्षक वाघिणीने सध्या धुमाकुळ घातला आहे. यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. राळेगाव -पांढरकवडा भागातील नागरिकांना भयग्रस्त करणाऱ्या या वाघिणीचे नाव टी-१ असून तिने शार्पशूटर्सनाही हुलकावणी दिली आहे.

या वाघिणीला जेरबंद करण्यात २०० कर्मचाऱ्यांच्या ताफ्यालाही यश आलेले नाही. आता वन विभागाने या वाघिणीच्या शोधासाठी जगप्रसिद्ध केल्वीन क्लेन परफ्यूमचा शिडकावा जंगलात करण्याची योजना आखली आहे. या परफ्यूमच्या सुगंधाने वाघीण आकर्षित होईल, असे वन विभागाला वाटते.

उल्फा अतिरेक्यांच्या गोळीबारात एकाच कुटुंबातील ५ ठार

केल्वीन क्लेन परफ्यूम वापरणाऱ्यांकडे महिला आकर्षित होतात, असा केल्वीन क्लेनचा दावा आहे. याच परफ्यूमने नरभक्षक वाघिणीला आकर्षित करण्याचा प्रयत्न वन विभाग करणार आहे. याबाबत माहिती देताना अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी म्हटले आहे की, अशाप्रकारचा प्रयोग यापूर्वी अमेरिकेत एका चवताळलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी करण्यात आला होता. त्यावेळी हेच परफ्यूम वापरले गेले होते. मात्र तो प्रयत्न अपयशी नव्हता. या १२५ मि.ली. परफ्यूमची किंमत ४ ते ५ हजारात असून अमेरिकेतील सर्वात प्रतिष्ठित ब्रँड म्हणून हे परफ्यूम ओळखले जाते.

जाहिरात