Forest Guard Swati Agham Yavatmal | कौतुकास्पद ! लेडी सिंघमचं पशुप्रेम पाहून तुम्हालाही करावसं वाटेल कौतुक

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – Forest Guard Swati Agham Yavatmal | यंदाच्या वर्षी होळीच्या आधीपासून वातावरण तापल्याचं दिसत आहे. माणसांनाच नाहीतर प्राण्यांनाही याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. जंगलामध्ये वन्यप्राण्यांना पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भटकंती करावी लागते. मात्र पक्षांची तहान भागवण्यासाठी आणि मुक्या जीवांची पोटातील खळगी भागवण्यासाठी सावळी वनक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या कुऱ्हा (Kurha) येथील बीटच्या वनरक्षक स्वाती अघम या कौतुकास्पद असं काम करत आहेत.

 

स्वाती अघम स्वत:चे पैसे खर्च करून प्राण्यांसाठी आणि पक्षांसाठी खाण्याची – पिण्याची सोय केली आहे.
स्वाती यांनी आपल्या या कृतीतून समाजात सर्वांसमोर मोठा आदर्श ठेवला आहे.
इतकंच नाहीतर त्यांनी जंगलातील लाकूड तोडणाऱ्यांसह बाकी इतर चोरट्यांचा बंदोबस्त करत त्यांनी वृक्षतोडीला मोठ्या प्रमाणात आळा घातला.

 

2011 मध्ये वनविभागात वनरक्षक (Forester) म्हणून नोकरीला लागल्या होत्या, सध्या स्वाती अघम या सावळी वन परिक्षेत्रात कार्यरत आहेत.
येथे त्यांच्याकडे असलेल्या क्षेत्रात पशु – पक्षांना पिण्यासाठी पाणी आणि चारा उपलब्ध करून त्यांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

 

दरम्यान, जंगलात स्वत:च्या खर्चाने पक्षांसाठी पाण्याचे भांडे व धान्य त्या नियमित ठेवतात.
त्यामुळे पक्षांचा किलबिलाट येथे पहायला मिळतो.
घनदाट जंगलात कुठल्याही भीती शिवाय त्या वनरक्षण तर करतातच पण सोबत पक्षांच्या प्रेमातून मानवतेचा आगळावेगळा संदेश देखील देत असल्याने वृक्षा सोबत पक्षांवर जीव लावणारी अनोखी स्वाती अघम नावाची वाघीण चर्चेचा विषय बनली आहे.

 

Web Title :- Forest Guard Swati Agham Yavatmal | forest guard swati agham is doing help to birds in yavatmal forest jungles

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा