वन अधिकार्‍याला दारू पाजून बनवला ‘अश्‍लील’ व्हिडीओ अन् केला ‘व्हायरल’

भरतपुर (राजस्थान) : वृत्तसंस्था – अवैधरित्या खनन करणाऱ्या ठेकेदारांनी एका वन अधिकाऱ्याचे अपहरण करुन बेदम मारहाण केली. तसेच या वन अधिकाऱ्याला दारू पाजून त्याला एका अर्धनग्न महिलेसोबत झोपवले. याचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. हा धक्कादायक प्रकार राजस्थानमधील भरतपुरमध्ये घडला. शौकीन खान असे अपहरण करून मारहाण करण्यात आलेल्या वन अधिकाऱ्याचे नाव आहे.

वन अध‍िकारी को प‍िलाई शराब, बनाया अश्लील वीड‍ियो, फ‍िर क‍िया वायरल

खोह पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील अडवली गावच्या डोंगरावर मागील अनेक दिवसांपासून अवैधरित्या खनन करण्यात येत आहे. हा प्रकार थांबवण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तसेच अवैध खनन करण्यास वन अधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या ठेकेदारांनी गस्तीवर असलेल्या शौकीन खान या अधिकाऱ्याचे अपहरण करून बेदम मारहाण केली.

वन अध‍िकारी को प‍िलाई शराब, बनाया अश्लील वीड‍ियो, फ‍िर क‍िया वायरल

ठेकेदारांनी वन अधिकाऱ्याला जबरदस्ती दारू पाजून त्याचे कपडे काढून त्याला एका अर्धनग्न महिलेसोबत झोपवले. त्याचा अर्धनग्न महिलेसोबतचा व्हिडीओ काढून तो सोशल मिडियावर व्हायरल करून अधिकाऱ्याची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. तसेच महिलेने वन अधिकाऱ्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करून त्याला त्यामध्ये अडकवण्याचा ठेकदेरांचा हेतू होता.

वन अध‍िकारी को प‍िलाई शराब, बनाया अश्लील वीड‍ियो, फ‍िर क‍िया वायरल

पीडित शौकीन खान यांनी सांगितले की, अवैधरित्या होत असलेले खनन थांबवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची जबाबदारी आपल्यावर आहे. गस्त घालत असताना खनन होत असलेल्या ठिकाणी गेलो असता दुचाकीवरून आलेल्या ठेकेदारांनी मला पकडले. मला मारहाण करून एका मिहिलेला बोलावून घेतले. त्या महिलेसोबत मला जबरदस्तीने झोपवून माझा व्हिडीओ काढल्याचे खान यांनी सांगितले.

वन अध‍िकारी को प‍िलाई शराब, बनाया अश्लील वीड‍ियो, फ‍िर क‍िया वायरल

दरम्यान, वन अधिकारी शौकीन खान आणि दलीत महिलेने पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, जंगलामध्ये काम करत असताना वन अधिकाऱ्यांनी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोघांच्याही तक्रारी नोंदवून घेतल्या असून व्हायरल झालेला व्हिडीओ तपासण्यात येत आहे.

वन अध‍िकारी को प‍िलाई शराब, बनाया अश्लील वीड‍ियो, फ‍िर क‍िया वायरल

आरोग्यविषय वृत्त –