कोट्यवधीची संपत्ती, पुण्यात फार्म हाऊस, आता जेलमध्ये IFS ऑफिसर बाप आणि मुलगा

नवी दिल्ली : ओडिसा कॅडरचे भारतीय वन सेवा (आयएफएस) अधिकारी अभय कांत पाठक, ज्यांच्या नावावर मोठी संपत्ती व्हिजिलन्सच्या अधिकार्‍यांना मिळाली होती, त्यांच्या मुलाच्या नावावर सुद्धा मोठ्या संपत्तीचा खुलासा झाला आहे. शुक्रवारी दोघांना अटक करण्यात आली आहे. सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस व्हिजिलन्स एम. राधाकृष्णा यांनी म्हटले की, राज्याच्या अतिरिक्त मुख्य वन संरक्षक अभय कांत पाठक आणि त्यांचा मुलगा आकाश पाठक यांना न्यायालयात सादर करण्यात आले. त्यांनी सांगितले की, मुलाच्या नावावर सुमारे 9.35 कोटी रूपये मिळाले आहेत. मात्र, याच्या बाबतीत कोणतेही समाधानकारक उत्तर अजून मिळालेले नाही.

छापेमारी नंतर अधिकारी आणि त्यांच्या मुलाने आरोप फेटाळले आहेत. राज्य सतर्कता अधिकार्‍यांनी म्हटले की, त्यांच्याकडे एका सरकारी कर्मचार्‍याच्या तुलनेत खुपच जास्त संपत्ती आहे. अनेक ठिकाणी पाठक यांच्या मालकीच्या संपत्तीच्या चौकशीसाठी संचालनालयाने तीन दिवसात 150 अधिकार्‍यांना तैनात केले.

चार्टर्ड प्लेनने केला प्रवास
संपत्तीच्या तपासात आढळले की, लॉकडाऊनच्या दरम्यान सुद्धा अधिकार्‍याने अनेक चार्टर्ड प्लेनने प्रवास केला होता. चार्टर उड्डाणांच्या बिलांमध्ये पुणे, भुवनेश्वर, पाटणा, मुंबई, जमशेदपुर आणि दिल्ली सारख्या शहरांचा समावेश आहे. अधिकारी मलेशिया, हाँगकाँग, युनायटेड किंगडम, संयुक्त अरब अमीरात आणि मालदीवला सुद्धा गेला होता. आकाश पाठकला 15 डिसेंबरला नवीन पटनायक सरकारमधील एका माजी मंत्र्याच्या मुलीशी विवाह करायचा होता. मुंबईच्या ताज महल पॅलेस हॉटेलमध्ये 90 लाखांपेक्षा जास्तचे हॉटेल बिल आणि उदयपूरमध्ये ताज लेक पॅलेस हॉटेलसाठी 20 लाखांचे प्री पेमेंट पाठक यांच्या कुटुंबाकडून करण्यात आले होते.

मुलाच्या बँक खात्यात 9.35 कोटी मिळाले
आकाश पाठकच्या बँक खात्यात सुमारे 9.35 कोटी रूपये मिळाले, ज्यापैकी 8.4 कोटी रूपये जमा करण्यात आले होते. हे बहुतांश भुवनेश्वरच्या एटीएममधून जमा केले गेले आहेत. अभयकांत यांच्या मुलाच्या नावावर पुण्यात 5 लाख रुपये महिने भाडेतत्वावरील फार्महाऊस तपासात आढळले आहे. अनेक लग्झरी कार आणि मोटरसायल अधिकार्‍याच्या मुलाच्या नावावर नोंदणी करण्यात आल्या होत्या.