…म्हणून स्वत:ला पिंजर्‍यात स्वतःला Lock करुन 100 फूट खोल विहरीमध्ये उतरला अधिकारी

पोलिसनामा ऑनलाईन टीम – बिबट्याला वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकत एका अधिकार्‍याने 100 फूट खोल विहरीमध्ये स्वत: पिंजर्‍यामध्ये बसून या विहरीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. कर्नाटकमधील म्हैसूर येथील एका वन अधिकार्‍याला कोरड्या विहरीमध्ये बिबट्या पडल्याची माहिती मिळाली. मात्र बिबट्याचा आवाज वगैरे काहीच येत नसल्याने वनअधिकार्‍याने स्वत: पिंजर्‍यामधून विहरीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. या अधिकार्‍याचे फोटो भारतीय वन विभागाच्या सेवेत असणार्‍या प्रवीण कासवान यांनी ट्विटवरुन शेअर केले आहे.


पिंजर्‍यामधील अधिकार्‍याचे नाव सिद्धराजू असे असून ते नागरहोल येथील स्थानिक वनअधिकारी आहे. एका बिबट्याला वाचवण्यासाठी ते 100 फूट खोल कोरड्या विहरीमध्ये उतरले होते. हातात मोबाइल फोन, बॅटरी घेऊन स्वत:ला पिंजर्‍यामध्ये कोंडून हा अधिकारी बिबट्याला वाचवण्यासाठी कोरड्या विहरीत उतरला. याला म्हणतात आपल्या कामाबद्दलची प्रतिब्धता. अशा ग्रीन सोल्जर्सचा अभिमान वाटतो, असे कासवान यांनी ट्विट केले आहे.

100 फूट खोल विहरीमध्ये बिबट्या पडला असून त्याचा आवाजही येत नसल्याने अधिकार्‍यांना तो नक्की कुठे आहे हेच समजत नव्हते. म्हणूनच सिद्धराजू यांनी स्वत: पिंजर्‍यामधून विहरीमध्ये बिबट्या नक्की कुठे अडकला आहे हे पाहण्यासाठी जायचे ठरविले. ते बिबट्या पकडण्यासाठी वापरण्यात येणार्‍या लोखंडी पिंजर्‍यामध्ये मांडी घालून बसले. त्यांना त्यांच्या सहकार्‍यांनी लॉक केले. त्यानंतर हा पिंजरा विहरीमध्ये सोडण्यात आला. मात्र सिद्धराजू आणि त्यांच्या सहकार्‍यांची सर्व मेहनत वाया गेली. कारण एवढा खटाटोप केल्यानंतर या विहरीमध्ये बिबट्या पडला नसल्याचे स्पष्ट झाले. सिद्धराजू यांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि वन्यप्राण्यांचा जीव वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकण्याची तयारी पाहून अनेकांनी सोशल नेटवर्किंगवरुन त्यांचे कौतुक केले आहे.