Forest | शास्त्रज्ञांनी 50 वर्षांपूर्वी लावले होते ‘हे’ जंगल, आता येथे जाण्याच्या नावाने सुद्धा लोकांच्या उरात भरते धडकी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Forest | जगात रहस्यांची कमतरता नाही. काही रहस्य अशी आहेत ज्यांच्याबाबत ऐकूनच लोक घाबरतात. तर काही रहस्य अशी आहेत ज्यांच्या बाबत आजही कुणाला समजू शकलेले नाही. आज आम्ही एक अशा जंगलाबाबत सांगणार आहोत जे रहस्यांनी भरलेले आहे. हे जंगल (Forest) जपानमध्ये आहे. या जंगलाबाबत ऐकूनच लोकांचा थरकाप उडतो.

या जंगलात जाण्यास सर्वचजण घाबरतात. जपानच्या या जंगलात असे काही आहे जे जगातील इतर जंगलांमध्ये नाही. जपानच्या मियाजाकी प्रीफेक्चरमध्ये निचिनन सिटीजवळ हे जंगल आहे. या जंगलाची सर्वात अजब गोष्ट ही आहे की, उंचीवरून ते पाहिले तर असे वाटते की, येथे एखादा युएफओ म्हणजे एखादा एलियन उतरला आहे.

या जंगलात लावलेली झाडे चक्राकार आकृती निर्माण करतात. असे वाटते की हे एखाद्या चक्राने घेरलेले आहे. जर तुम्ही विमान किंवा हेलिकॉप्टरने या जंगलावरून गेलात तर त्याची आकृती पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्ही हे एकून हैराण व्हाल की हे जंगल नैसर्गिक नाही, तर शास्त्रज्ञांनी ते एक प्रयोग म्हणून बनवले आहे.

जपानच्या या जंगलाची विशेष बाब ही आहे की, शास्त्रज्ञांनी हा प्रयोग अलिकडे केलेला नसून तब्बल 50 वर्षापूर्वी केला होता.
शास्त्रज्ञांनी हा प्रयोग असा केला होता की, येथे चक्राकार आकाराची झाडे उगवावीत.
शास्त्रज्ञांनी या प्रोजेक्टला ’एक्सप्रिमेंटल फॉरेस्ट्री’ नाव दिले होते.
या एक्सप्रिमेंटचा उद्देश झाडांच्या अंतराच्या आधारावरून त्यांच्या विकास जाणून घेणे.

 

Web Title : Forest | scientists had grown 50 years ago this scary forest now people shiver to go there

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

PM Modi | ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधानांनी केले PM मोदींचे कौतूक, म्हणाले – ‘चीनसाठी भारत एकमेव उत्तर’

Anti Corruption Trap | 90 हजाराची लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील सर्वेअरसह खासगी ठेकेदार अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

IPCC Report | आगामी काही वर्षात मुंबईसह 12 शहरांना मोठा धोका? ‘या’ रिपोर्टनुसार धक्कादायक खुलासा