Forever Mine : ‘बाहुबली’ फेम राणा डग्गुबाती गर्लफ्रेंड मिहीका बजाजसोबत ऑफिशियली Engaged ! साखरपुड्याचे फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम : भारतीय सिनेमा इतिहासातील सर्वात मोठा सिनेमा बाहुबली मध्ये भल्लालदेव ही भूमिका साकारणाऱ्या राणा डग्गुबाती यानं लॉकडाऊनमध्येच आपल्या साखरपुड्याची घोषणा केली होती. राणा लवकरच मिहीका बजाज हिच्यासोबत लग्न करणार आहे. राणानं मिहीकासोबत साखरपुडा केला आहे. अलीकडेच त्यानं इंस्टावरून साखरपुड्याचे काही फोटो शेअर केले आहेत.

View this post on Instagram

And it’s official!! 💥💥💥💥

A post shared by Rana Daggubati (@ranadaggubati) on

राणानं बुधवारी (दि 20 मे) मिहीकासोबत साखरपुडा केला आहे आणि ऑफिशियली एंगेज्ड झाला आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर राणानं पांढऱ्या रंगाचा पारंपरिक पोषाख घातला होता. त्याची लेडीलव मिहीकानं देखील पारंपरिक नारंगी आणि गुलाबी रंगाची साडी घातली होती. इंस्टावरून फोटो शेअर करत राणानं खास कॅप्शनही दिलं आहे. राणा म्हणतो, आता हे ऑफिशियल आहे.

मिहीकानं देखील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिनंही फोटोंना खास कॅप्शन दिलं आहे. काही फोटो राणानं इंस्टा स्टोरीलाही शेअर केले आहेत. सध्या या कपलचे फोटो सोशलवर तुफान व्हायल होताना दिसत आहेत. अनेकांनी कपलचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

To the beginning of forever 💕 @ranadaggubati

A post shared by miheeka (@miheeka) on

कोण आहे मिहिका बजाज ?
एका न्यूज एजन्सीनुसार, मिहिका एक इव्हेंट प्लॅनर आहे. मुबंईतील ड्यु ड्रॉप डिझाईन स्टुडिओची ती मालकीन आहे. राणाच्या वर्कफ्रंटबद्दल बोालायचं झालं तर त्याच्या हाथी मेरे साथी या सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली आहे. यात पुलकित सम्राटही दिसणार आहे.

View this post on Instagram

And she said Yes 🙂 ❤️#MiheekaBajaj

A post shared by Rana Daggubati (@ranadaggubati) on