‘झालं गेलं विसरून जा’…दीपक तुला ब्लॉक करतेय  !’ राखीचा पुन्हा नवा ड्रामा 

मुंबई : वृत्तसंस्था – आपल्या बिनधास्त वागण्यामुळे आयटम गर्ल राखी सावंत नेहमीच चर्चेत असते. चर्चेत राहण्यासाठी ती दररोज काही ना काही ड्रामा करतच असते. आता ती आणखी एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.
ड्रामा क्विन राखी सावंतने अलीकडे दीपक कलाल सोबत लग्न करणार असे जाहिर केले अन् सोशल मीडियावर खळबळ माजली. लग्नाचे कार्ड देखील तिने शेअर केले .नंतर एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये देखील अश्लिल बोलून निव्वळ ड्रामेबाजी केली. त्यानंतर आता राखीने सोशल मीडियावर एक व्हडिओ पोस्ट केला आहे. यात तिने दीपक कलाल वर गंभीर आरोप केले आहेत. तसेच माझे कुटुंबीय झाल्या घटनेवरून नाराज आहेत. झाल गेलं विसरून जा असे सांगत दिपकला ब्लॉक करण्याचा इशारा राखीने दिला आहे.
काय आहे व्हिडीओत 
“मला माफ कर दीपक, माझे कुटुंब तुझ्यावर खूप नाराज आहे. जे काही झाले, ते त्यांना अजिबात आवडलेले नाही. मी १४-१५ वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत आहे. मी खूप मेहनत केलीय. मी माझ्या कुटुंबाला सांभाळत आहे. त्यामुळे मला घाणेरडी पब्लिसिडी नकोय. जे काही झाले ते विसर. लोक मला शिव्या देतात, अश्लिल बोलतात. मी खूप भोळी, देवावर श्रद्धा असलेली मुलगी आहे. मला खोटे बोलणे आवडत नाही. तुझ्या नादी लागून मी खोटे बोलले”, असे राखीने या व्हिडिओत म्हटले आहे.या व्हिडिओनंतर युजर्सनी राखीला पुन्हा एकदा फैलावर घेतले आहे. हा सुद्धा राखीचा नवा पब्लिसिटी स्टंट असल्याचे युजर्सनी म्हटले आहे.
ड्रॅमेबाज राखीची  प्रेस कॉन्फरन्स 
रविवारी २ डिसेंबर रोजी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्यादरम्यान देखील राखीने नको तो ड्रामा केला होता . यादरम्यान ती म्हणाली होती ,
कोणत्याही गोष्टीवरून दुसऱ्या सोबत तुलना करण्याची सवय असलेली राखी यावेळी म्हणाली होती की ‘दीपिका पादुकोण हिने लग्नात १ कोटीचा लहंगा घातला होता, असे मी ऐकले आहे , यानुसार तर मी माझ्या लग्नात ८ कोटींचा लहंगा घालायला पाहिजे लग्नाविषयी माहिती देताना राखी व तिच्या पतिने तर हद्दच केली. पुढे राखी म्हणाली होती की ,’लग्नानंतर मी आणि दीपक कलाल हे भाऊ-बहीण बनून राहणार आहोत. लग्नाच्या रिसेप्शनमध्ये मी शाहरूख, सलमान, करिना आणि दीपिका यांना आमंत्रण दिले आहे. तसेच दीपक म्हणाला,’आमच्या लग्नाचे बजेट जास्त नसून केवळ ७० कोटी आहे. त्यावर बोलता बोलता राखीने त्याला अडवत विचारले,’त्यांनी ८५ कोटींचा उल्लेख केला होता, १५ कोटी कुठे गेले? त्यावर दीपकने सांगितले होते  की, काही पैसा कपड्यांमध्ये खर्च झाला आहे.’
राखीची लग्नपत्रिका 
राखी सावंत आणि दीपक कलाल या दोघांनीही आपापल्या इन्स्टाग्रामवर वेडिंग कार्ड शेअर करून ‘कुटुंबासह लग्नाला यायचं हं’…असं आवाहन केलं होत . ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी लॉस एन्जलिस या ठिकाणी दोघे विवाह बंधनात अडकणार आहेत. अशी या पत्रिकेत नमूद करण्यात आलं होत. दीपक कलाल यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर करून राखी सावंतला प्रपोज केले होते. राखीनंही इन्स्टाग्रामवरून हा व्हिडिओ शेअर करून प्रपोजल स्वीकारलं होतं.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us